चिनी सैरभैर! कोरोना पुन्हा वाढताच माणसांसह मासे व खेकड्यांची करतायेत RT-PCR चाचणी, Video

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 01:34 PM2022-08-20T13:34:36+5:302022-08-20T13:41:03+5:30

COVID Cases Rise in China:  Fish And Crabs Also Undergo RT-PCR Test - चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढतानाचे चित्र दिसत आहे.

Video : coronavirus cases rise in China : local authorities in China's Xiamen region have started RT-PCR testing not only the citizens but also its live seafood, such as fish and crabs | चिनी सैरभैर! कोरोना पुन्हा वाढताच माणसांसह मासे व खेकड्यांची करतायेत RT-PCR चाचणी, Video

चिनी सैरभैर! कोरोना पुन्हा वाढताच माणसांसह मासे व खेकड्यांची करतायेत RT-PCR चाचणी, Video

googlenewsNext

COVID Cases Rise in China:  Fish And Crabs Also Undergo RT-PCR Test - चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढतानाचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निर्बंध लादण्याची तयारी सुरू झाली आहे आणि RT-PCR चाचणीचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. BBC ने दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत ५ लाखांपेक्षा अधिक लोकांना RT-PCR चाचणी करण्याचे आदेश दिले गेले आहे, तर दुसरीकडे समुद्रातील जीवांचीही चाचणी चिनच्या  Xiamen येथे केली जात असल्याचे समोर आले आहे.
मासे, खेकडे आदींची RT-PCR चाचणी होत असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारयल झाले आहेत. यात PPE किट्स घातलेले आरोग्य सेवक मास्याच्या तोंडातू व खेकड्याच्या कवचातून स्वॅब्सचे नमूने घेत असल्याचे दिसत आहेत.  


आरोग्य सेवकाकडून समुद्रीजीवांच्या या RT-PCR चाचणीच्या व्हिडीओला २ लाखांहून अधिक व्ह्यू मिळालेले आहेत आणि तेवढेच शेअरही मिळाले आहेत. काही नेटिझन्स आरोग्य सेवकांचे समर्थन करताना दिसत आहेत, तर काही विरोधही करत आहेत.   

चीनमध्ये ५-६ ऑगस्टला एका दिवसाला १६-१७ हजार कोरोना रुग्ण सापडल्याने पुन्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. सध्याच्या घडीला चीनमधील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही ८२४३ इतकी आहे.  

Web Title: Video : coronavirus cases rise in China : local authorities in China's Xiamen region have started RT-PCR testing not only the citizens but also its live seafood, such as fish and crabs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.