Donald Trump: मोठी बातमी! मादुरो अटकेत, व्हेनेझुएलावर अमेरिकेची सत्ता; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 00:11 IST2026-01-04T00:10:22+5:302026-01-04T00:11:06+5:30

US Attack on Venezuela: अमेरिकन लष्कराने व्हेनेझुएलावर भीषण हल्ला करत राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केली आहे.

Venezuela is now under US control; Maduro arrested, Donald Trump massive announcement | Donald Trump: मोठी बातमी! मादुरो अटकेत, व्हेनेझुएलावर अमेरिकेची सत्ता; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

Donald Trump: मोठी बातमी! मादुरो अटकेत, व्हेनेझुएलावर अमेरिकेची सत्ता; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

जागतिक राजकारणात आज एक अत्यंत धक्कादायक आणि ऐतिहासिक घडामोड घडली. अमेरिकन लष्कराने व्हेनेझुएलावर भीषण हल्ला करत राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केली आहे. या लष्करी कारवाईनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएला आता पूर्णपणे अमेरिकेच्या नियंत्रणाखाली असून तिथे अमेरिकन राजवट लागू झाली आहे, अशी अधिकृत घोषणा.

फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी या मोहिमेचा सविस्तर खुलासा केला. ते म्हणाले की, "माझ्या आदेशानुसार काल रात्री आणि आज सकाळी हवाई, जमीन आणि समुद्र अशा तिन्ही मार्गांनी व्हेनेझुएलावर हल्ला करण्यात आला. दुसऱ्या महायुद्धानंतर जगाने न पाहिलेली ही सर्वात मोठी लष्करी कारवाई होती. अमेरिकेने आपल्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली क्षमतेचे प्रदर्शन करत एका हुकूमशहाचा अंत केला आहे."

मादुरो दाम्पत्य न्यूयॉर्कला रवाना; अमेरिकेत चालणार खटला

हुकूमशहा निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकन सैन्याने ताब्यात घेतले असून त्यांना न्यूयॉर्कला आणले जात आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, मादुरोवर आता अमेरिकन न्यायालयात खटला चालवला जाईल. विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या कारवाईत एकाही अमेरिकन सैनिकाचा मृत्यू झाला नसल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

तेल उद्योगावर अमेरिकेचा ताबा

व्हेनेझुएलाच्या विस्कळीत झालेल्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करताना ट्रम्प म्हणाले की, "व्हेनेझुएलातील तेल व्यवसाय पूर्णपणे अपयशी ठरला आहे. आता जगातील सर्वात मोठ्या अमेरिकन तेल कंपन्या तिथे जातील, अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करतील आणि तेथील पायाभूत सुविधांची दुरुस्ती करतील. व्हेनेझुएलाचे भवितव्य आता अमेरिकाच ठरवेल."

ड्रग्ज माफियांचे कंबरडे मोडले

या लष्करी मोहिमेदरम्यान केवळ सत्तापालटच झाला नाही, तर अमेरिकेने समुद्रमार्गे होणारी अवैध ड्रग्जची तस्करीही रोखली आहे. या कारवाईत ९७ टक्के ड्रग्ज नष्ट करण्यात आल्याचे ट्रम्प यांनी अभिमानाने सांगितले.

जगाला स्पष्ट इशारा

"जगातील कोणताही देश इतक्या कमी वेळात इतके मोठे साध्य करू शकत नाही. आता कोणीही अमेरिकेला आव्हान देण्याची हिंमत करू नये," अशा कडक शब्दांत ट्रम्प यांनी इतर देशांना इशारा दिला आहे. गरज पडल्यास आणखी मोठा हल्ला करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे, मात्र आता त्याची गरज भासणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title : मादुरो गिरफ्तार, वेनेजुएला पर अमेरिका का कब्ज़ा: ट्रम्प की घोषणा

Web Summary : एक चौंकाने वाली कार्रवाई में, अमेरिकी सेना ने वेनेजुएला के राष्ट्रपति मादुरो को गिरफ्तार किया। ट्रम्प ने वेनेजुएला पर अमेरिकी नियंत्रण की घोषणा की, एक बड़े सैन्य अभियान का हवाला देते हुए वेनेजुएला के तेल उद्योग और भविष्य की देखरेख करने की योजना बताई। मादुरो पर अमेरिका में मुकदमा चलेगा।

Web Title : Maduro Arrested, US Takes Over Venezuela: Trump Announces

Web Summary : In a shocking move, the US military arrested Venezuelan President Maduro. Trump declared US control, citing a massive military operation and plans to oversee Venezuela's oil industry and future. Maduro faces trial in America.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.