अमेरिकेच्या कारवाईवर न्यूयॉर्कचे नवे महापौर भडकले, मादुरो यांच्या अटकेवरून केलं मोठं विधान; रशिया, चीन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 09:52 IST2026-01-04T09:51:05+5:302026-01-04T09:52:23+5:30
US Venezuela action : कुठल्याही सार्वभौम देशावर असा प्रकारची एकतर्फी सैन्य कारवाई युद्धाचे कृत्य मानली जाते आणि याचा परिणाम न्यूयॉर्क सारख्या बहुसांस्कृतिक शहरवरी पडतो, असेही ते म्हणाले...

अमेरिकेच्या कारवाईवर न्यूयॉर्कचे नवे महापौर भडकले, मादुरो यांच्या अटकेवरून केलं मोठं विधान; रशिया, चीन...
अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलामध्ये कारवाई करत, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अटक केली आहे. अमेरिकेच्या या कारवाईने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. दरम्यान, न्यूयॉर्कचे नवनिर्वाचित महापौर जोहरान ममदानी यांनी या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला असून, हे आंतरराष्ट्रीय कायद्यांचे आणि सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर, कुठल्याही सार्वभौम देशावर असा प्रकारची एकतर्फी सैन्य कारवाई युद्धाचे कृत्य मानली जाते आणि याचा परिणाम न्यूयॉर्क सारख्या बहुसांस्कृतिक शहरवरी पडतो, असेही ते म्हणाले.
काय म्हणाले न्यूयॉर्केचे नवे महापौर ममदानी? -
न्यूयॉर्केचे नवे महापौर ममदानी यांनी, ही कारवाई म्हणजे 'युद्धाचे कृत्य' असल्याचे म्हटले असून, कोणत्याही सार्वभौम देशावर असा एकतर्फी हल्ला चुकीचा आहे. हे युद्धाचे कृत्य मानले जाते. सत्तेत बदल घडवून आणण्याचा हा कुला प्रयत्न, केवळ आंतरराष्ट्रीयच नव्हे तर न्यूयॉर्कमधील जनतेवरही याचा परिणाम होतो. विशेषतः हजारो व्हेनेझुएलाच्या नागरिकांवर. न्यूयॉर्क हे बहुसांस्कृतिक शहर आहे. येथील प्रत्येक नागरिकाची सुरक्षितता ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे.
I was briefed this morning on the U.S. military capture of Venezuelan President Nicolás Maduro and his wife, as well as their planned imprisonment in federal custody here in New York City.
— Mayor Zohran Kwame Mamdani (@NYCMayor) January 3, 2026
Unilaterally attacking a sovereign nation is an act of war and a violation of federal and…
रशिया, चीन आणि इराणकडून कारवाईचा निषेध -
अमेरिकेच्या या कारवाईने जगात राजकारणात खळबळ उडाली आहे. जागतिक स्तरावर दोन गट निर्माण झाले असून, रशिया, चीन आणि इराण यांसारख्या देशांनी अमेरिकेच्या या कारवाईचा निषेध केला आहे. महत्वाचे म्हणजे, संयुक्त राष्ट्राने याला एक 'धोकादायक पायंडा' म्हणून संबोधले आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३ जानेवारी रोजी 'ऑपरेशन अॅब्सोल्यूट रिझॉल्व्ह' अंतर्गत व्हेनेझुएलावर मोठी कारवाई केल्याचा दावा केला. अंमली पदार्थ तस्करी आणि दहशतवादाच्या (नार्को-टेररिझम) आरोपाखाली मादुरो यांना अटक करून न्यूयॉर्कमधील फेडरल कोठडीत ठेवण्यात येणार आहे.कारकासमध्ये झालेल्या या हवाई हल्ल्यात किमान ४० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.