शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका मध्य पूर्वेत १ हजार सैनिक उतरवणार, UNचे प्रमुख म्हणाले, 'हे युद्ध जगाला कवेत घेत आहे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 16:47 IST

इराणसोबतचे युद्ध थांबवण्यासाठी हालचाली करत असतानाच अमेरिका एक हजार सैनिक मध्य पूर्वेत उतरवणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

अमेरिका आपल्या लष्करातील ८२वी एअरबोर्न तुकडीतील तब्बल १ हजार सैनिक आगामी काळात मध्य पूर्वेत उतरवण्याची शक्यता आहे. 'सीएनएन'ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. ८२वी एअरबोर्न ही अमेरिकन लष्कराची विशेष तुकडी आहे. नॉर्थ कॅरोलविनातील तळावर असणारी ही तुकडी १८ तासांच्या आत जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचू शकते. 

शीघ्र कृती दल म्हणूनच एअरबोर्न बटालियन ओळखली जाते. या एका बटालियनमध्ये ४००० सैनिक असलेल्या तीन तुकड्या असतात. एक एव्हिएशन ब्रिगेड (यात हल्ला, वाहतूक आणि कॉर्गो हेलिकॉप्टर यांचा समावेश असतो.) एक दारुगोळा तुकडी आणि लॉजिस्टिक, मुख्यालय तुकडीचा समावेश असतो.    

"युद्ध संपूर्ण जगाला कवेत घेत आहे"

संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार संघटनेचे प्रमुख वॉल्कर तुर्किए यांनी या युद्धाबद्दल इशारा दिला आहे. "सध्या सुरू असलेल्या युद्धाने भयंकर आणि अनिश्चित परिस्थिती निर्माण केली आहे. हे युद्ध इतके गंभीर आहे की, ते संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेऊ शकते."

"जो आमच्याविरोधात त्याच्यासाठी होर्मुझ बंद"

दरम्यान, इराणने होर्मुझ सामुद्रधुनीबद्दल भूमिका मांडली आहे. "जे आमच्याविरोधात नाही, त्यांना होर्मुझ सामुद्रधुनीत जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते. आपल्या उच्चायुक्तालयाच्या माध्यमातून असे जहाज सुरक्षित रस्त्याचा वापर करू शकतात. जो इराणविरोधातील कोणत्याही गोष्टींमध्ये सहभागी नाहीत आणि इराणच्या नियमांचं पालन करत आहेत."

इराणने होर्मुझ सामुद्रधुनीबद्दल ही भूमिका मांडली असली, तरी प्रत्यक्षात स्थिती मात्र वेगळी आहे. दरदिवशी १२० जहाजे होर्मुझ मार्गे जात होती. आता ही संख्या कमी होऊन दिवसाला ४-५ जहाजेच होर्मुझ पार करू शकत आहेत. म्हणजे या जलमार्गाने होणारा व्यापार जवळपास ठप्प झाला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : US to Deploy Troops to Middle East; UN Warns of Global War

Web Summary : The US may deploy 1,000 troops to the Middle East. The UN warns the conflict risks engulfing the world. Iran's stance on the Strait of Hormuz impacts trade significantly, with ship traffic drastically reduced.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराणWarयुद्धAmericaअमेरिका