शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

बायडेन यांच्या शपथविधीदरम्यान हिंसाचाराची शक्यता; ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये लागू केली आणीबाणी

By जयदीप दाभोळकर | Published: January 12, 2021 7:36 PM

२० जानेवारीला पार पडणार आहे बायडेन यांचा शपथविधी सोहळा

ठळक मुद्दे२० जानेवारीला पार पडणार आहे बायडेन यांचा शपथविधी सोहळा बायडेन यांच्या शपथविधीसोहळ्यादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी वॉशिंग्टनमध्ये आणीबाणी

अमेरिकेच्या संसदेत गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारामुळे महासत्ता हडबडली आहे. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेला अडचणीत आणण्यासाठी कोणत्याही देशांवर अण्वस्त्रांचा हल्ला करू शकतात अशी भीती असतानाचा डेमोक्रेट सदस्यांनी ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावावर उद्या मतदान होण्याची शक्यता आहे. या मुळे ट्रम्प यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. परंतु एकीकडे ही घटना ताजी असतानाच दुसरीकडे वॉशिंग्टनमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. बायडेन यांच्या शपथविधीदरम्यान हिंसाचार होऊ शकतो, अशी माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. त्यानंतर व्हाईट हाऊसनं २४ जानेवारीपर्यंत वॉशिंग्टनमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली. २० जानेवारी रोजी बायडेन यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आजच डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव दाखल करण्यात आला. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये आणीबाणी जाहीर केली. २४ जानेवारीपर्यंत ही आणीबाणी लागू राहणार आहे. दरम्यान, बायडेन यांच्या शपथविधीदरम्यान हिंसाचार होऊ शकतो. तसंच ५० राज्यांच्या राजधान्या आणि वॉशिंग्टन डीसी मध्ये शसस्त्र हल्ला करण्याचा कट आखला जात असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली. त्यानंतर व्हाईट हाऊसनं वॉशिंग्टन डीसीमध्ये आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला. कॅपिटल हिलमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर एफबीआय आणि अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. यानंतर बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. तसंच सुरक्षा व्यवस्थेतही मोठी वाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पॅटागॉननं राजधानीमध्ये १५ हजारांहून अधिक नॅशनल गार्ड्स तैनात करण्याची परवानगी दिली आहे.  

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पJoe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिकाUSअमेरिकाUS Riotsअमेरिका-हिंसाचारUS ElectionAmerica Election