शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:23 IST

Donald Trump on Iran Attack Israel: इस्रायलने इराणवर हल्ला चढवल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेची पुढची भूमिका काय असेल, याबद्दलही ते बोलले आहेत. 

Iran Attack on Israel Latest News: इराणमधील आण्विक केंद्र आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य करत इस्रायलने २०० लढाऊ विमानांनी हल्ला केला. तेहरानच्या आजूबाजूला असलेल्या ६ लष्करी आणि ४ आण्विक केंद्रावर इस्रायलने हल्ले केले. या हल्ल्याचे पडसाद जगभरात उमटले असून, अमेरिकेच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भाष्य केले आणि अमेरिकेची भूमिका मांडली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

इराणविरोधात इस्रायलने ऑपरेशन रायझिंग लायन सुरू करत हल्ले केले. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार इस्रायलने इराणवर २०० लढाऊ विमानांनी हवाई हल्ले केले. यात ६ लष्करी आणि ४ आण्विक केंद्राचे नुकसान करण्यात आले. 

वाचा >>इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 

इस्रायलने हल्ला केल्यानंतर इराणनेही इस्रायलवर १०० ड्रोन डागले आहेत. इस्रायलच्या आयडीएफने (इस्रायल डिफेन्स फोर्सेस) म्हटले आहे की, हे ड्रोन पुढील १ ते २ तासांत इस्रायलमध्ये पोहोचू शकतात. हे ड्रोन इराक आणि जॉर्डनच्या हवाई हद्दीत आहेत. त्यामुळे जॉर्डनची राजधानी अम्मानमध्ये सायरन वाजत आहेत. 

डोनाल्ड ट्रम्प इस्रायल-इराण संघर्षावर काय बोलले?

इस्रायलने इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. फॉक्स न्यूजशी बोलताना ट्रम्प यांनी या संघर्षाबद्दल भाष्य केले.

"इस्रायल इराणवर हल्ला करणार याची मला आधीपासूनच माहिती होती. इस्रायलच्या या लष्करी कारवाईमध्ये अमेरिकेच्या सैन्याचा सहभाग नाही", असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. 

"इराणकडे अणुबॉम्ब असू शकत नाही. आम्हाला पुन्हा चर्चा सुरू होईल अशी आशा आहे. पुढे काय होतं, याकडे आमचे लक्ष आहे. परंतू इराणमधील नेतृत्व करणारे असे काही लीडर आहेत, जे परत येणार नाहीत", असे डोनाल्ड ट्रम्प मारल्या गेलेल्या व्यक्तींबद्दल म्हणाले. 

अमेरिकेने इस्रायलच्या हल्ल्यात इराणमधील उच्च पदावरील अनेक नेते मारले गेल्याच्या वृत्ता दुजोरा दिला आहे. 

ट्रम्प म्हणाले, "अमेरिकेच्या प्रशासनाने हल्ला होण्यापूर्वीच मध्य पूर्वेतील एका मित्रराष्ट्राशी संपर्क केला होता आणि त्यांना हल्ला होणार असल्याची माहिती दिली होती." डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या देशाचा उल्लेख करणे यावेळी टाळले. 

आमचे सगळे पर्याय संपले होते -इस्रायल

इस्रायलचे परराष्ट्र मत्री गिदोन सार इराणवरील हवाई हल्ल्यानंतर म्हणाले, "इराणच्या आण्विक केंद्र आणि लष्करी केंद्रावरील हल्ले करण्याचा निर्णय मजबुरीने घ्यावा लागला. हा निर्णय तेव्हा घ्यावा लागला, जेव्हा आमचे सगळे पर्याय संपले होते. इराण कोणत्याही परिस्थितीत थांबण्यास तयार नव्हता आणि त्याला रोखणे गरजेचे झाले होते", असे सार यांनी जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वेडेफुल यांच्याशी बोलताना सांगितले. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIsraelइस्रायलIranइराणwarयुद्धAmericaअमेरिका