Russia Ukraine War: अणुबॉम्बचा स्फोट झाला तर हे औषध ठरणार 'रामबाण'! अमेरिकेत विक्री वाढली; जाणून घ्या याबद्दल खास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 09:42 PM2022-03-15T21:42:32+5:302022-03-15T21:43:40+5:30

काही लोकांच्या मते, या टॅबलेट्स किरणोत्सारानंतर होणारा विषारी प्रभाव कमी करतात...

US people scared to nuclear attack amaid russia ukraine war, potassium iodide tablets sell increased | Russia Ukraine War: अणुबॉम्बचा स्फोट झाला तर हे औषध ठरणार 'रामबाण'! अमेरिकेत विक्री वाढली; जाणून घ्या याबद्दल खास

Russia Ukraine War: अणुबॉम्बचा स्फोट झाला तर हे औषध ठरणार 'रामबाण'! अमेरिकेत विक्री वाढली; जाणून घ्या याबद्दल खास

Next

 रशिया आणि युक्रेन यांच्यात जबरदस्त युद्ध सुरू आहे. यामुळे अमेरिकेतील नागरिकही भयभीत झाले आहेत. खरे तर, रशिया अणुयुद्ध छेडू शकतो, अशी भीती येथील लोकांच्या मनात आहे. या भीतीपोटीच हे लोक पोटॅशियम आयोडाइटच्या गोळ्या विकत घेत आहेत. तथापि, अणुबॉम्बचा स्फोट होण्याची कल्पनाच मनात धडकी भरवणारी आहे. असे झाल्यास लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो. कारण यामुळे दूरवर असलेले लोकही रेडिएशनच्या संपर्कात येतील.

अणुबॉम्बचा स्फोट झाल्यास हे औषध ठरेल उपयोगी - 
काही लोकांच्या मते, या टॅबलेट्स किरणोत्सारानंतर होणारा विषारी प्रभाव कमी करतात. मात्र, कुणी या टॅब्लेट्सचे चुकून अधिक सेवन केले, तर हे घातकही सिद्ध होऊ शकते. अचानकपणे या टॅब्लेट्सची विक्री वाढल्याने तिचे दरही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. 

औषधाचे दर वाढले -
मांध्यमांतील वृत्तांनुसार, आधी ही टॅब्लेट लोक 1070 मध्ये विकत घेत होते. मात्र, आता हिची किंमत 1 लाख 14 हजार रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे. एवढेच नाही, तर अनेक वेबसाइट्सवर हे औषध आऊट ऑफ स्टॉकही दिसत आहे.

अधिक सेवन घातक -
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (CDC) म्हटले आहे की, या टॅब्लेट्सचे अधिक सेवन करणे घातकही ठरू शकते. सीडीसीने म्हटल्यानुसार, सिंगल डोस पोटॅशियम आयोडाइड टॅबलेट, थायरॉइड ग्लँडला 24 तासांपर्यंत सुरक्षित ठेवते. मात्र, हिचे अधिक सेवन केल्यास शरिराला नुकसान पोहोचू शकते.

Web Title: US people scared to nuclear attack amaid russia ukraine war, potassium iodide tablets sell increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.