१६ वर्षीय दोन विद्यार्थ्यांना 'या' कामासाठी हॉटेलमध्ये घेऊन गेली महिला शिक्षिका, झाली एक वर्षाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 13:25 IST2021-12-29T13:10:44+5:302021-12-29T13:25:23+5:30

Female teacher sexually abuse two Student : २९ वर्षीय गणिताच्या शिक्षिकेला शारीरिक संबंध ठेवण्याची इतकी इच्छा झाली की, ती तिच्या १६ वर्षांच्या दोन विद्यार्थ्यांना हॉटेलमध्ये घेऊन गेली.

US : Maths teacher, 29, jailed after bringing two student to hotel room for sex | १६ वर्षीय दोन विद्यार्थ्यांना 'या' कामासाठी हॉटेलमध्ये घेऊन गेली महिला शिक्षिका, झाली एक वर्षाची शिक्षा

१६ वर्षीय दोन विद्यार्थ्यांना 'या' कामासाठी हॉटेलमध्ये घेऊन गेली महिला शिक्षिका, झाली एक वर्षाची शिक्षा

जगातल्या वेगवेगळ्या देशातून महिलांनी अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण केल्याच्या अनेक धक्कादायक घटना नेहमीच समोर येत असतात. मात्र, यात काही घटना इतक्या धक्कादायक असतात की, विश्वासच बसत नाही. महिला शिक्षिकेने अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण केल्याची एक विचित्र घटना समोर आली आहे. २९ वर्षीय गणिताच्या शिक्षिकेला शारीरिक संबंध ठेवण्याची इतकी इच्छा झाली की, ती तिच्या १६ वर्षांच्या दोन विद्यार्थ्यांना (Female teacher sexually abuse two Student) हॉटेलमध्ये घेऊन गेली.

२९ वर्षीय गणिताच्या या महिला शिक्षिकेला तिच्या या गंभीर गुन्ह्यासाठी १ वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा झाली आहे. तिची ही शिक्षा वाढून पाच वर्षांचीही होऊ शकते. Daily Star च्या वृत्तानुसार, अमेरिकेतील (America) ओहियो राज्यात २९ वर्षीय गणिताची शिक्षिका क्रिस्टीना सोस्बेला एका वर्षाची शिक्षा झाली आहे. 

या शिक्षिकेवर आरोप आहे की, ती तिच्या १६ वर्षांच्या दोन विद्यार्थ्यांना हॉटेलमध्ये घेऊन गेली आणि तिने दोघांसोबतही शारीरिक संबंध ठेवले. या कामासाठी ती तिच्या गणिताच्या विद्यार्थ्यांना जवळच्या हॉटेलमध्ये घेऊन गेली आणि तिथे त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.

ही घटना डिसेंबर २०१८ ची आहे. या प्रकरणावर इतकी वर्ष कोर्टात सुनावणी सुरू होती. आता तिला शिक्षा सुनावण्यात आली. याप्रकरणी कोफिनच्या स्पोकपर्सनने सांगितलं की, सोस्बे ही शाळेची कर्मचारी नव्हती. तर ती पेस ऑर्गनायझेशनमध्ये काम करत होती.

स्पोकपर्सनने सांगितलं की, महिला शिक्षिका Courthouse Square मधील एका हॉटेलमध्ये दोन विद्यार्थ्यांना घेऊन गेली होती. २९ वर्षीय या शिक्षिकेचं गणित शिकवण्याचं लायसन्स गेल्यावर्षीच नेहमीसाठी कॅन्सल करण्यात आलं होतं. या शिक्षिकेला या कृत्यासाठी ५ वर्षांची शिक्षाही मिळू शकली असती. पण एक वर्षांचीच शिक्षा झाली.
 

Web Title: US : Maths teacher, 29, jailed after bringing two student to hotel room for sex