Us Looking to Ban Chinese Apps Like Tiktok Says Secretary Of State Mike Pompeo | अमेरिकेचंही भारताच्या पावलावर पाऊल?; चीनला 'मोदी स्टाईल'मध्ये उत्तर देण्याची तयारी

अमेरिकेचंही भारताच्या पावलावर पाऊल?; चीनला 'मोदी स्टाईल'मध्ये उत्तर देण्याची तयारी

वॉशिंग्टन: लडाखमध्ये कुरघोड्या करून सीमेवरील तणाव वाढवणाऱ्या चीनला भारतानं सर्वच आघाड्यांवर चीतपट केलं. सामरिक, आर्थिक, कूटनीती अशा सर्वच क्षेत्रांमध्ये भारतानं चीनला जोरदार धक्के दिले. त्याचा परिणाम काल दिसला. चीननं गलवान खोऱ्यातून आपलं सैन्य दोन किलोमीटर माघारी बोलावलं. चीनला आर्थिक झटका देण्यासाठी आता अमेरिकादेखील भारताच्या पावलावर पाऊल टाकण्याची शक्यता आहे. तसे संकेत परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो यांनी दिले आहेत. 

आम्ही चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याच्या विचारात असल्याचं परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो यांनी म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियामध्येही चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे लवकरच चीनला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. एकट्या भारतातल्या बंदीमुळे टिकटॉकला जवळपास ६ अब्ज डॉलर्सचं नुकसान होतं आहे. यामध्ये आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

लडाख सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. चिनी अ‍ॅप देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं धोकादायक असल्याचं म्हणत भारत सरकारनं चिनी अ‍ॅपवर बंदी घातली. त्यामुळे चिनी कंपन्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. आम्ही भारतीय वापरकर्त्यांची माहिती चीन सरकारला देत नसल्याचं स्पष्टीकरण चिनी कंपन्यांनी दिलं आहे. चीन सरकारनं कधीही वापरकर्त्यांचा तपशील मागितला नसल्याचं टिकटॉकचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन मेयर यांनी भारत सरकारला लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.

भारत सरकारनं काही दिवसांपूर्वीच टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. मात्र या अ‍ॅपवर चीनमध्ये खूप आधीपासूनच बंदी आहे. टिकटॉक अ‍ॅप बाईट डान्स या चिनी कंपनीच्या मालकीचं आहे. भारत सरकारनं बंदी घातल्यानंतर बाईट डान्स कंपनीनं चीन सरकारपासून अंतर राखलं आहे. भारतीय वापरकर्त्यांचा तपशील सिंगापूरमध्ये असलेल्या सर्व्हरमध्ये ठेवला जातो. चीन सरकारनं कधीही वापरकर्त्यांची माहिती मागितलेली नाही आणि सरकारनं अशी विनंती केल्यास आम्ही ती कधीही पूर्ण करणार नाही, असं स्पष्टीकरण वारंवार टिकटॉककडून देण्यात येत आहे.

चीनच्या अडचणी वाढल्या; जिनपिंग सरकारविरोधात मुस्लिम थेट आंतरराष्ट्रीय कोर्टात

दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेने दाखवली लष्करी ताकद; चीनच्या धमकीची उडवली खिल्ली

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Us Looking to Ban Chinese Apps Like Tiktok Says Secretary Of State Mike Pompeo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.