वॉशिंग्टन - अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सकाळी इराणसोबत सुरु असलेल्या युद्धाबाबत भाष्य केले. आम्ही अजून २-३ आठवडे इराणवर प्रचंड हल्ले करून आणि त्याला पाषाणात पोहचू अशी धमकी त्यांनी दिली आहे. मागील काही दिवसांपासून नरमाईची भूमिका घेणारे आणि युद्धातून बाहेर पडण्याची भाषा वापरणारे ट्रम्प अचानक आक्रमक का झाले असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. आता अमेरिका पुढील ३ आठवडे युद्ध सुरू ठेवणार आहे. त्यामुळे ट्रम्प यांची भाषा का बदलली यामागे विश्लेषक कारणं सांगत आहेत.
काहींच्या मते, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात एक भीती आहे जर हे युद्ध कुठल्याही निष्कर्षाशिवाय संपवले, अमेरिकन सैन्य मागे हटले तर इराणने कुठलीही अट मान्य केली नाही असा संदेश जगात जाईल. त्यामुळे इराणला पुन्हा उभारी मिळेल आणि आसपासच्या देशांसाठी जे अमेरिकेशी जवळीक साधतात त्यांच्यासाठीही मोठे आव्हान निर्माण होईल. स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद करून इराणने एक चॅलेंज उभं केले. त्यात अमेरिकेने युद्धामध्येच माघार घेतली तर इराणचा विजय झाला असा प्रचार सुरू होईल. त्यामुळे इराण सरकार आणि जनता दोघांमध्ये उत्साह निर्माण होईल. इराणी समर्थक हुथी, हमास आणि हिजबुल्लाहसारख्या दहशतवादी संघटनाही पुन्हा सक्रिय होऊ शकतात.अशा परिस्थितीत अमेरिकेला इराणवर इतका दबाव आणायचा आहे की त्याला वाटाघाटीच्या टेबलावर येण्यास भाग पाडावे. इतकेच नव्हे तर इराणने नरमाईची भूमिका स्वीकारल्यानंतरच अमेरिकेला माघार घ्यायची आहे. अमेरिकेला माघार घेण्यास भाग पाडले गेले असा संदेश टाळण्यासाठी हे केले जात आहे.
याच कारणामुळे मजबुरीने का होईना परंतु युद्ध सुरू ठेवणे हेच अमेरिकेच्या हिताचे असल्याचं ट्रम्प यांना वाटते. खरा मुद्दा हा आहे की युद्ध संपवण्यासाठी निर्णायक वळण कोणते असावे याचा अमेरिका विचार करत आहे. अमेरिका युद्ध अर्धवट थांबवणे टाळत आहे. अमेरिकेला युद्ध संपवायचे आहे हे खरे असले तरी जर इराणला तसे करायचे नसेल तर त्यातूनही चुकीचा संदेश जाईल. म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा असूनही ते एकतर्फी युद्ध समाप्तीची घोषणा करू शकले नाहीत असं दुबईस्थित बहुथ रिसर्च सेंटरचे संचालक मोहम्मद बहरून यांनी सांगितले.
दरम्यान, इराणने स्ट्रेट होर्मुझ खंडीत करून जगाला हा संदेश दिला की आमच्यावर हल्ला करण्यापूर्वी कुणालाही २ वेळा विचार करायला हवा. विशेषत: संयुक्त अरब अमीरातसारख्या देशांना या युद्धात ओढून घेण्यात आले. हे त्यांच्यासाठीही आव्हान आहे. भारत, चीन, पाकिस्तानसारख्या अनेक देशांवर ऊर्जा संकट उद्भवले. ही परिस्थिती अमेरिकेसाठी चिंताजनक होती.
Web Summary : Trump fears ending the Iran war without a clear victory would embolden Iran and its allies, creating regional instability. He wants Iran to negotiate and show weakness before the US withdraws to avoid appearing defeated and to maintain American influence.
Web Summary : ट्रंप को डर है कि ईरान युद्ध को बिना स्पष्ट जीत के समाप्त करने से ईरान और उसके सहयोगियों को बढ़ावा मिलेगा, जिससे क्षेत्रीय अस्थिरता पैदा होगी। वह चाहते हैं कि अमेरिका की वापसी से पहले ईरान बातचीत करे और कमजोरी दिखाए ताकि हार से बचा जा सके और अमेरिकी प्रभाव बना रहे।