US Israel Iran War : श्रीलंकेतून ८४ इराणी खलाशांचे मृतदेह तुर्कीच्या विमानातून रवाना; इराणने बदला घेण्याची घेतली शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 16:07 IST2026-03-14T15:50:32+5:302026-03-14T16:07:35+5:30

अमेरिकेच्या हल्ल्यात बुडालेल्या इराणी युद्धनौका 'आयआरआयएस डेना' मधील ८४ खलाशांचे मृतदेह श्रीलंकेने इराणला पाठवले आहेत. ४ मार्च रोजी श्रीलंकेतील गॅलेच्या किनाऱ्यावर विशाखापट्टणम येथील नौदल सरावातून परत येत असताना यावर हल्ला झाला.

US Israel Iran War : Bodies of 84 Iranian sailors flown from Sri Lanka on Turkish plane; Iran vows revenge | US Israel Iran War : श्रीलंकेतून ८४ इराणी खलाशांचे मृतदेह तुर्कीच्या विमानातून रवाना; इराणने बदला घेण्याची घेतली शपथ

US Israel Iran War : श्रीलंकेतून ८४ इराणी खलाशांचे मृतदेह तुर्कीच्या विमानातून रवाना; इराणने बदला घेण्याची घेतली शपथ

अमेरिकेने हिंदी महासागरात हल्ला केलेल्या इराणी युद्धनौका 'आयआरआयएस डेना'बाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. श्रीलंकेने हल्ल्यात ठार झालेल्या ८४ इराणी खलाशांचे मृतदेह परत इराणला पाठवले आहेत. श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील गॅलेजवळ इराणची युद्धनौका अमेरिकेने बुडवली होती. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला होती.  दरम्यान, या मृत खुलाशांचा मृतदेह श्रीलंकेने इराणला पाठवले आहेत. शुक्रवारी एका खाजगी तुर्की एअरलाइनने हे मृतदेह इराणला पाठवल्याचे वृत्त आहे.

हाहाकार! US-इस्रायल अन् इराण युद्धात २ आठवड्यांत किती मृत्यू झाले? किती नुकसान झालं? आकडा जाणून थक्क व्हाल 

मिळालेल्या माहितीनुसार, ४ मार्च रोजी श्रीलंकेतील गॅले किनाऱ्याजवळील हिंद महासागरात अमेरिकेच्या टॉर्पेडोने युद्धनौकेवर हल्ला केला होता, यामुळे  ते जहाज बुलाले होते. या हल्ल्यानंतर ८४ खलाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते, तर ३२ जणांना वाचल्यानंतर त्यांना श्रीलंकेच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. 

११ मार्च रोजी, श्रीलंकेच्या मुख्य दंडाधिकाऱ्यांनी करापिटिया राष्ट्रीय रुग्णालयाच्या संचालकांना मृतदेह इराणी दूतावासाकडे सोपवण्याचे आदेश दिले. यापूर्वी, श्रीलंकेच्या सरकारने सांगितले होते की, परिस्थिती सामान्य होईपर्यंत मृतदेह ताब्यात ठेवण्यात येतील जेणेकरून त्यांना सुरक्षितपणे मायदेशी परत पाठवता येईल. हल्ल्यातून वाचलेल्या ३२ खलाशांना रविवारी रुग्णालयातून सोडण्यात आले.

इराणने शहीदांचा बदला घेण्याची शपथ घेतली

दरम्यान, इराणने हल्ल्याबाबत कडक भूमिका घेतली आहे. इराणी लष्कराचे कमांडर-इन-चीफ अमीर हतामी यांनी सांगितले की, इराण त्यांच्या युद्धनौकेवरील हल्ल्याला निश्चितच प्रत्युत्तर देईल. त्यांनी सांगितले की, डेना जहाज आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे बलिदान इराणी नौदलाच्या इतिहासात नेहमीच लक्षात ठेवले जाईल आणि देश त्यांच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी नौदलाला आणखी बळकट करेल. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, हल्ला झाला तेव्हा जहाज कोणत्याही शत्रुत्वात सहभागी नव्हते आणि लष्करी सरावातून परतत होते. 

Web Title : अमेरिकी हमले के बाद ईरान का बदला लेने का संकल्प; नाविकों के शव वापस

Web Summary : अमेरिकी हमले के बाद श्रीलंका ने 84 ईरानी नाविकों के शव तुर्की के माध्यम से वापस भेजे। ईरान ने बदला लेने की कसम खाई, कहा कि बलिदान को याद रखा जाएगा और नौसेना को समुद्री सीमाओं की रक्षा के लिए मजबूत किया जाएगा।

Web Title : Iran Vows Revenge After US Attack; Sailors' Bodies Repatriated

Web Summary : After a US attack on an Iranian warship, Sri Lanka repatriated 84 sailors' bodies via Turkey. Iran vowed revenge, stating the sacrifice will be remembered and the navy strengthened to protect its maritime borders.