युद्ध नाही, आता महायुद्धाची तयारी; अमेरिकेचा इराणमधील 400 किलो युरेनियमवर डोळा, लष्करी कारवाई...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 13:33 IST2026-03-30T13:32:39+5:302026-03-30T13:33:07+5:30

US-Iran War: डोनाल्ड ट्रम्प लवकरच मोठा निर्णय घेणार!

US-Iran War: No war, now preparing for a world war; America has its eye on 400 kg of uranium in Iran | युद्ध नाही, आता महायुद्धाची तयारी; अमेरिकेचा इराणमधील 400 किलो युरेनियमवर डोळा, लष्करी कारवाई...

युद्ध नाही, आता महायुद्धाची तयारी; अमेरिकेचा इराणमधील 400 किलो युरेनियमवर डोळा, लष्करी कारवाई...

US-Iran War: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाला एक महिना उलटला, मात्र परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही. अशातच, आता अमेरिकेका इराणमध्ये घुसून लष्करी कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलीकडील विधानांमुळे आणि मध्यपूर्वेत वाढत्या अमेरिकन लष्करी उपस्थितीमुळे या चर्चेला अधिक जोर मिळाला आहे.

काय आहे ट्रम्प यांचा प्लान?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेला इराणमध्ये साठवून ठेवलेले सुमारे 400 किलोग्राम युरेनियम मिळवायचे आहे. अमेरिकेला भीती आहे की, इराण सरकार या युरेनियमचा वापर अण्वस्त्रे तयार करण्यासाठी करू शकते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे तयार करू दिली जाणार नाहीत. याच पार्श्वभूमीवर आता अमेरिका इराणमध्ये लष्करी मोहिम राबवण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे.

सर्वकाही ठप्प; फक्त 24 तासांसाठी इंटरनेट बंद झाल्यास काय होईल? जाणून घ्या...

लष्करी कारवाई धोकादायक ठरू शकते

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ही कारवाई सुरू करणार की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र तज्ज्ञांच्या मते, जर अमेरिका हे लष्करी अभियान सुरू करत असेल, तर ते अत्यंत धोकादायक ठरू शकते.या मोहिमेसाठी अमेरिकन सैन्याला अनेक दिवस किंवा त्याहून अधिक काळ इराणमध्ये राहावे लागू शकते. काही अमेरिकी अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले की, ट्रम्प सैन्याला होणाऱ्या जोखमीचा विचार करत आहेत, पण गरज पडल्यास ते कारवाईस तयार आहेत.

खार्ग बेट आणि इराणी तेलावर ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य

एका मुलाखतीदरम्यान ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेला इराणचे तेल हवे आहे आणि ते इराणच्या प्रमुख तेल निर्यात केंद्र असलेल्या खार्ग बेटावर कब्जा करण्याचा विचार करू शकतात. हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा अमेरिका मध्यपूर्वेत आपली लष्करी उपस्थिती वाढवत आहे आणि इराणमधील युरेनियम ताब्यात घेण्यासाठी संभाव्य लष्करी कारवाईचा विचार करत आहे.

मध्यपूर्वेत अमेरिकन सैन्याची वाढती तैनाती

मीडिया रिपोर्टनुसार, पेंटागन मध्यपूर्वेत सुमारे 10,000 अतिरिक्त सैनिक तैनात करण्याची तयारी करत आहे. अमेरिकन सेंट्रल कमांडने जाहीर केले की, 2,500 मरीन सैनिकांसह 3,500 पेक्षा जास्त सैनिक आधीच मध्यपूर्वेत पोहोचले आहेत. 

Web Title : अमेरिका की ईरान के यूरेनियम पर नज़र, बढ़ते तनाव के बीच सैन्य कार्रवाई की आशंका।

Web Summary : मध्य पूर्व संघर्ष के बीच, अमेरिका ईरान में 400 किलोग्राम यूरेनियम जब्त करने के लिए सैन्य कार्रवाई पर विचार कर रहा है, उसे परमाणु हथियार विकास का डर है। ट्रंप ईरानी परमाणु क्षमताओं को रोकना चाहते हैं। सैन्य कार्रवाई जोखिम भरी है, जिसके लिए लंबे समय तक उपस्थिति की आवश्यकता है, लेकिन ट्रंप जरूरत पड़ने पर तैयार हैं। अमेरिका मध्य पूर्व में सैन्य उपस्थिति बढ़ा रहा है।

Web Title : US Eyes Iran's Uranium, Military Action Looms Amid Rising Tensions.

Web Summary : Amidst Middle East conflict, the US considers military action in Iran to seize 400kg of uranium, fearing nuclear weapon development. Trump wants to prevent Iranian nuclear capabilities. Military action is risky, requiring prolonged presence, but Trump is prepared if necessary. US is increasing military presence in the Middle East.