मध्य पूर्वेतील युद्धाने आता टोकाची मर्यादा ओलांडली आहे. इराणचे सर्वात महत्त्वाचे तेल निर्यात केंद्र असलेल्या 'खर्ग बेटावर' अमेरिका ताबा मिळवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे रोखण्यासाठी इराणने अत्यंत आक्रमक पाऊल उचलले असून, बेटाच्या सभोवतालच्या समुद्रात मोठ्या प्रमाणावर सागरी सुरुंग पेरल्याचे वृत्त समोर आले आहे.
खर्ग बेट हे इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. इराणच्या एकूण कच्च्या तेलाच्या निर्यातीपैकी ९०% पेक्षा जास्त निर्यात याच बेटावरून होते. जर अमेरिकेने या बेटावर ताबा मिळवला किंवा हे बंदर उद्ध्वस्त केले, तर इराणची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल.
अमेरिकन नौदलाच्या हालचाली रोखण्यासाठी इराणने पर्शियन आखातातील या मोक्याच्या ठिकाणी सुरुंग पेरले आहेत. यामुळे केवळ लष्करी जहाजेच नव्हे, तर व्यापारी तेल टँकर्सनाही मोठा धोका निर्माण झाला आहे. इराणने इशारा दिला आहे की, जर त्यांच्या भूभागावर हल्ला झाला, तर ते संपूर्ण जगाचा इंधन पुरवठा रोखून धरतील.
पेंटागॉनमधील सूत्रांनुसार, अमेरिकन लष्कर खर्ग बेटावर 'सर्जिकल स्ट्राईक' किंवा ताबा मिळवण्याच्या रणनीतीवर काम करत आहे. मात्र, इराणने लावलेल्या सुरुंगांमुळे अमेरिकेच्या 'एअरक्राफ्ट कॅरिअर्स' आणि युद्धनौकांसाठी हे ऑपरेशन अत्यंत जोखमीचे ठरू शकते. अमेरिकन लष्कराला खर्ग बेटावर ताबा मिळवून इराणवर दबाव टाकायचा आहे, जेणेकरून 'होरमुझची सामुद्रधुनी' तेल वाहतुकीसाठी खुली करता येईल. मात्र, अमेरिकन लष्करी तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या जमिनीवरील मोहिमेत मोठ्या प्रमाणावर अमेरिकन सैनिक मारले जाण्याची दाट शक्यता आहे.
जागतिक बाजारात खळबळया बातमीमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. होरमुझची सामुद्रधुनी आणि खर्ग बेटावरील तणावामुळे भारतासह अनेक आशियाई देशांमध्ये इंधन टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Web Summary : Tensions escalate as the US eyes Iran's Kharg Island, a key oil export hub. Iran responds by mining surrounding waters, threatening global oil supply. US plans for a potential strike face significant risks, sparking global market volatility and fuel shortage fears.
Web Summary : अमेरिका की ईरान के खर्ग द्वीप पर नज़र, जो एक प्रमुख तेल निर्यात केंद्र है, तनाव बढ़ता है। ईरान ने आसपास के पानी में बारूदी सुरंगें बिछाकर जवाब दिया, जिससे वैश्विक तेल आपूर्ति खतरे में है। अमेरिकी हमलों की योजना से वैश्विक बाजार में अस्थिरता और ईंधन की कमी का डर है।