US Iran Embassy: अमेरिका आणि इराणमधील तणाव दिवसेंदिवस अधिक तीव्र होतोय. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (6 फेब्रुवारी) इराणमधील अमेरिकी दूतावासाने आपल्या नागरिकांना तातडीने इराण सोडण्याचा इशारा दिला आहे. यावरून देशातील वाढती सुरक्षा व्यवस्था, रस्ते बंद करण्याची प्रक्रिया आणि हवाई प्रवासावरील निर्बंधमुळे परिस्थिती गंभीर होत चालल्याचे संकेत मिळत आहेत.
तात्काळ देश सोडण्याचा इशारा
अमेरिकी दूतावासाने जारी केलेल्या अॅडव्हायझरीनुसार, अमेरिकन नागरिकांनी रस्ता, हवाई किंवा जलमार्गाचा वापर करून शक्य तितक्या लवकर इराणमधून बाहेर पडावे, असे सांगण्यात आले आहे. दूतावासाने नमूद केले की, जगभरातील अनेक एअरलाईन्स इराणकडे ये-जा करणाऱ्या उड्डाणांवर मर्यादा घालत आहेत, काही उड्डाणे रद्दही करण्यात येत आहेत, म्हणून नागरिकांनी विलंब न करता देश सोडावा.
मदतीची अपेक्षा करू नका; दूतावासाचा स्पष्ट इशारा
या अॅडव्हायझरीतील महत्त्वाची बाब म्हणजे, अमेरिकी सरकारकडून मदतीची अपेक्षा करू नका, असे दूतावासाने स्पष्टपणे म्हटले आहे. नागरिकांनी स्वतःच्या जबाबदारीवर आणि कोणत्याही सरकारी सहाय्याशिवाय शक्य तितक्या लवकर इराण सोडावे, असेही सूचित करण्यात आले आहे.
सुरक्षाव्यवस्था कडक; वाहतूक आणि हवाई सेवा मर्यादित
इराण सरकारकडून संभाव्य धोके लक्षात घेऊन अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्यात येत असून, हवाई प्रवासावरही मर्यादा आणल्या जात आहेत. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हालचालींवर मोठा परिणाम होत आहे. या घडामोडींमुळे दोन्ही देशांमध्ये संघर्ष किंवा युद्धाची शक्यता वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अणुकार्यक्रमावर आज महत्त्वाची चर्चा
या तणावाच्या पार्श्वभूमीवरच अमेरिका आणि इराण यांच्यात आज (शुक्रवारी) अणुकार्यक्रमाबाबत चर्चा होणार आहे. ही बैठक ओमानमध्ये होणार असून, दोन्ही देशांचे वरिष्ठ प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत.
Web Summary : Amid rising US-Iran tensions, the US Embassy urges citizens to immediately leave Iran due to security concerns and travel restrictions. Limited assistance will be provided. Nuclear talks are scheduled in Oman.
Web Summary : अमेरिका-ईरान तनाव बढ़ने के साथ, अमेरिकी दूतावास ने सुरक्षा चिंताओं और यात्रा प्रतिबंधों के कारण नागरिकों को तुरंत ईरान छोड़ने का आग्रह किया है। सीमित सहायता मिलेगी। ओमान में परमाणु वार्ता निर्धारित है।