इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 17:58 IST2026-04-03T17:57:11+5:302026-04-03T17:58:38+5:30
Iran US Plane Crash: इराणच्या दक्षिण भागात अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर कमी उंचीवर घिरट्या घालताना दिसली. त्याचे व्हिडीओही आता विविध माध्यम संस्थांकडून शेअर करण्यात आले आहेत.

इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
दक्षिण इराणमधील डोंगराळ भागात अमेरिकेची लष्करी विमाने आणि हेलिकॉप्टर्स घिरट्या घालताना दिसली. त्याचे व्हिडीओही समोर आले आहे. इराणने अमेरिकेचे एफ-१५ स्ट्राइक इगल हे लढाऊ विमान पाडल्यानंतर अमेरिकन लष्कराची विमाने दिसली. एफ-१५ विमानाच्या पायलटचा शोध घेण्यासाठी ही विमाने आणि हेलिकॉप्टर घिरट्या घालत होती, अशी माहिती इराणकडून दिली गेली आहे.
इराणने अमेरिकेचे एफ-१५ स्ट्राइक इगल हे लढाऊ विमान पाडले. या घटनेत विमानाचा पायलट बचावला आहे. विमान कोसळण्यापूर्वी पायलटने बाहेर पडला. पायलटचा शोध घेण्यासाठी अमेरिकेच्या लष्कराने मोहीम सुरू केली आहे.
अमेरिकेच्या हवाई दलाचे HC-१३०J हे शोध आणि मदत मोहिमेसाठीचे विमान आणि हेलिकॉप्टर्स विमान पडलेल्या भागात पायलटचा शोध घेत आहेत.
Additional footage of U.S. Air Force HC-130J “Combat King II” Combat Search and Rescue (CSAR) Aircraft and UH-60 Black Hawks flying at low-altitude this morning over Southern Iran, likely searching for the crew of a downed F-15E Strike Eagle. pic.twitter.com/66V6qrbjI2
— OSINTdefender (@sentdefender) April 3, 2026
इराणमधील सूत्रांनी दावा केला आहे की, पायलटच्या शोधासाठीच विमान कमी उंचीवर घिरट्या घालत आहे. याचेही व्हिडीओ इराणी माध्यमांकडून शेअर करण्यात आले आहेत.
NOW: Iranian sources claim U.S. aircraf/helicopters deployed to rescue pilots from a downed F-15E fighter jet in Iran. pic.twitter.com/2WoGPoGc5h
— Clash Report (@clashreport) April 3, 2026
एकीकडे डोनाल्ट ट्रम्प यांच्याकडून इराणवर आणखी हल्ले करण्याचा इशारा दिला जात असताना अमेरिकेने दुसरे एफ-१५ लढाऊ विमान गमावले आहे. या विमानाबद्दल काही वेगळी माहितीही समोर आली आहे. इराणने सुरुवातीला हे विमान F-35 असल्याचे म्हटले होते, परंतु सोशल मीडियावर आलेल्या अपघातग्रस्त विमानाच्या फोटोंवरून ते F-15E Strike Eagle असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.