शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 00:57 IST

याचा उद्देश, जागतिक व्यापार व्यवस्थेची पुनर्रचना करणे, अमेरिकेची व्यापार तूट कमी करणे आणि व्यापारी भागीदारांना अधिक सौदाबाजीसाठी प्रेरित करणे आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवा कार्यकारी आदेश जारी केला आहे. यानुसार, सोमवारपपासून (८ ऑगस्ट), जे देश अमेरिकेसोबत औद्योगिक निर्यातीसंदर्भात करार करतील, अशा व्यापारी भागीदार देशांना टॅरिफ सूट देण्यात येणार आहे. या सवलतीचा फायदा प्रामुख्याने, निकेल, सोने, औषधी संयुगे आणि रसायने यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींवर दिला जाईल. याचा उद्देश, जागतिक व्यापार व्यवस्थेची पुनर्रचना करणे, अमेरिकेची व्यापार तूट कमी करणे आणि व्यापारी भागीदारांना अधिक सौदाबाजीसाठी प्रेरित करणे आहे.

नव्या आदेशात विशेष काय? - ट्रम्प प्रशासनाच्या या आदेशांतर्गत, 45 हून अधिक गोष्टींच्या श्रेणी समाविष्ट करण्यात आल्या आहेत, ज्यांवर सहयोगी भागीदारांना शून्य आयात शुल्क मिळेल. हे असे भागीदार देश असतील, जे अमेरिकेसोबत एक फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी करतील आणि ट्रम्प प्रशासनाने लादलेले रेसिप्रोकल टॅरिफ आणि टॅरिफ कमी करण्याचे वचन देतील. हा निर्णय, जापान, युरोपीय संघासह (EU) अमेरिकेच्या विद्यमान सहयोगी देशांशी केलेल्या करारांशीही सुसंगत आहे. ही सूट सोमवारी रात्री 12 वाजल्यापासून लागू होईल.

कोणत्या वस्तूंना सूट दिली जाईल? व्हाईट हाऊसने दिलेल्या माहिती नुसार, ज्या वस्तूंचे उत्पादन अथवा उत्खनन अमेरिकेत नैसर्गितरित्या करता येत नाही, अथवा ज्या गोष्टीचे देशांतर्गत उत्पादन पुरेसे नाही, अशा वस्तूंवर कर कपात लागू होईल. या सवलती दिलेल्या वस्तूंमध्ये नैसर्गिक ग्रेफाइट, विविध प्रकारचे निकेल (जे स्टेनलेस स्टील आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीसाठी आवश्यक आहेत), लिडोकेन सारखे औषधी संयुगे आणि मेडिकल डायग्नोस्टिक टेस्टींगच्या रियाजेंट्सचा समावेश आहे. याशिवाय, पावडर, पाने आणि बुलियन सारख्या सोन्याच्या विविध वस्तूंचा देखील या सवलतींमध्ये समावेश आहे.या आदेशात काही कृषी उत्पादने, विमान आणि त्याचे भाग आणि पेटंट नसलेल्या औषधी वस्तूंसाठी देखील सूट देण्यात आली आहे.  तसेच, या नवीन आदेशाने, प्लास्टिक आणि पॉलिसिलिकॉन (जे सौर पॅनेलसाठी आवश्यक आहे) सह काही पूर्वी दिलेल्या सवलतीही रद्द केल्या आहेत.

टॅग्स :Trade Tariff Warटॅरिफ युद्धAmericaअमेरिकाUSअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प