Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 14:19 IST2026-04-05T14:17:26+5:302026-04-05T14:19:06+5:30

US–Iran Conflict: मध्यपूर्वेत सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासाठी त्यांचे सर्वात घातक मिसाइल तैनात केले आहे.

US Deploys Long-Range JASSM-ER Missiles in Middle East Amid Rising Iran Tensions | Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!

Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!

मध्यपूर्वेत सुरू असलेला अमेरिका–इराण संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून, आता अमेरिकेने आपल्या अत्याधुनिक आणि लांब पल्ल्याच्या JASSM-ER क्रुझ मिसाइल्स तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. या हालचालीमुळे युद्ध आणखी भयंकर वळण घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एवढेच नव्हे तर,या संघर्षाचा परिणाम केवळ या प्रदेशापुरता मर्यादित न राहता जागतिक सुरक्षेवरही होऊ शकतो.

JASSM-ER ची खासियत

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. अमेरिकेने प्रशांत महासागरातील तळांवरून मोठ्या प्रमाणात JASSM-ER मिसाइल्स मध्यपूर्वेकडे वळवली आहेत. JASSM-ER ही अमेरिकेची अत्यंत प्रगत आणि घातक क्रूझ मिसाइल प्रणाली आहे. ही मिसाइल रडारला चकवा देण्यास सक्षम आहे. तसेच ६०० मैलांपेक्षा अधिक अंतरावरून लक्ष्य भेदू शकते. शिवाय, शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालीला टाळून अचूक हल्ला करते. यामुळे पायलटला शत्रूच्या प्रदेशात न जाता सुरक्षित अंतरावरून हल्ला करता येतो.

अमेरिकेच्या शस्त्रसाठ्यावर परिणाम

अहवालानुसार, युद्ध सुरू झाल्यानंतर केवळ काही आठवड्यांतच अमेरिका १००० हून अधिक मिसाइल्स वापरून बसला आहे. या मोठ्या वापरामुळे अमेरिकेच्या शस्त्रसाठ्यावर परिणाम झाला आहे. युद्धापूर्वी अमेरिकेकडे सुमारे २ हजार ३०० मिसाइल्सचा साठा होता. मात्र, आता त्यांच्याकडे फक्त ४२५ मिसाइल्स शिल्लक राहिले असून ही अमेरिकेसाठी अत्यंत चिंतेची बाब आहे. कारण, इतका साठा निर्माण करण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागू शकतो.

जागतिक स्तरावर चिंता वाढली

या घडामोडींमुळे जागतिक स्तरावर चिंता वाढली आहे. इराणकडून ड्रोन आणि मिसाइल्स हल्ले सुरूच आहेत. अमेरिकेची काही लढाऊ विमाने आणि ड्रोनही पाडल्याचा दावा केला जात आहे. तज्ज्ञांच्या मते, या शस्त्रांचा मोठ्या प्रमाणात वापर केल्यामुळे भविष्यातील इतर संघर्षांसाठी अमेरिकेला शस्त्र साठ्यांची कमतरता जाणवू शकते.

Web Title : मध्य पूर्व युद्ध: अमेरिका ने घातक मिसाइलें तैनात कीं, ईरान पर संकट।

Web Summary : अमेरिका ने ईरान के साथ बढ़ते तनाव के बीच मध्य पूर्व में उन्नत JASSM-ER मिसाइलें तैनात कीं। इससे संघर्ष बढ़ सकता है, वैश्विक सुरक्षा पर असर पड़ सकता है। अमेरिका का मिसाइल भंडार घट रहा है, जिससे भविष्य के संघर्षों के बारे में चिंता बढ़ रही है क्योंकि ईरान ड्रोन हमले जारी रखता है।

Web Title : Middle East War: US deploys deadly missiles, Iran faces crisis.

Web Summary : US deploys advanced JASSM-ER missiles in the Middle East amidst rising tensions with Iran. This escalates conflict, potentially impacting global security. America's missile stockpile is dwindling, raising concerns about future conflicts as Iran continues drone attacks.