शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
3
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
4
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
5
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
6
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
7
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
8
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
9
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
10
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
12
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
13
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
14
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
15
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
16
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
17
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
18
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावरच केजरीवाल यांना अटक का? सर्वोच्च न्यायालयाची ईडीला विचारणा; म्हणाले...
20
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 

रिअल लाईफमधील बंटी-बबली, केली जगातील सर्वांत मोठी चोरी; 'असं' पकडलं भामट्या दाम्पत्याला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 6:22 AM

बिटकॉइनच्या हॅकिंगमध्ये हे जोडपं अतिशय तज्ज्ञ मानलं जातं. सहा वर्षांपूर्वी जेव्हा त्यांनी हा गफला केला होता, त्यावेळी त्याची किंमत होती ७१ मिलियन डॉलर्स. पण हळूहळू या चलनाची किंमत वाढत गेली आणि कोट्यवधी डॉलर्समध्ये त्याचं रुपांतर झालं.

‘ज्वेल थीफ’ हा हिंदी चित्रपट तुम्ही पाहिलाय? अभिनेता देव आनंद आणि त्यांचा भाऊ विजय आनंद यांनी १९६७मध्ये दिग्दर्शित केलेला हा त्या काळातला गाजलेला चित्रपट. गुन्हेगारी कथानक असलेला हा चित्रपट अजूनही अनेकांच्या स्मरणात असेल. अशीच एक ‘फिल्मी’ वाटणारी, पण प्रत्यक्षात घडलेली  स्टोरी सध्या प्रचंड गाजतेय. ही आहे एक चोरीची घटना. पण, त्यानं संपूर्ण जगातच उलथापालथ घडवून आणली होती. क्रिप्टोकरन्सी चलनातील ही चोरी आजपर्यंतची सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी चोरी मानली जाते.

अमेरिकेच्या न्याय विभागाने यासंदर्भात गेल्या आठवड्यातच एका तरुण जोडप्याला अटक केली आहे. ४.५ बिलियन डॉलर किमतीचे बिटकॉइन्स त्यांच्याकडून नुकतेच ‘जप्त’ करण्यात आले आहेत. काही रक्कम त्यांनी आधीच खर्च केली् आहे. ज्यावेळी त्यांच्याकडून हे बिटकॉइन्स जप्त करण्यात आले, त्यावेळी त्यांची किंमत होती ३.६ बिलियन डॉलर्स, पण काही दिवसांतच या चलनाची किंमत वाढली.खरं तर चोरीची ही घटना तशी बरीच जुनी, म्हणजे सहा वर्षांपूर्वीची. पण आजपर्यंत हे कोडं उकललं नव्हतं आणि चोरी कोणी, कशी केली, हे पोलिसांना शोधून काढता आलं नव्हतं. कारण या दाम्पत्यानं इतक्या चलाखीनं आणि गुंतागुंतीच्या पध्दतीने हा डल्ला मारला होता, की तो गुंता सोडवायलाच, सायबरतज्ज्ञांनाही सहा वर्षे लागली. पण अखेर भामटे नवरा - बायको जाळ्यात सापडलेच.

बिटकॉइनच्या हॅकिंगमध्ये हे जोडपं अतिशय तज्ज्ञ मानलं जातं. सहा वर्षांपूर्वी जेव्हा त्यांनी हा गफला केला होता, त्यावेळी त्याची किंमत होती ७१ मिलियन डॉलर्स. पण हळूहळू या चलनाची किंमत वाढत गेली आणि कोट्यवधी डॉलर्समध्ये त्याचं रुपांतर झालं. अमेरिकेच्या न्याय विभागानं नुकतंच जाहीर केलं आहे, की उलगडायला, शोधून काढायला अत्यंत जटील असलेल्या आणि आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या डिजिटल चोरीचा पर्दाफाश आम्ही केला आहे. आम्हाला त्याचा अतिशय आनंद आहे. यासंदर्भात ज्या दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे, त्यात इलया लिचटेन्टसटाइन (३४) आणि त्याची बायको हीथर मॉर्गन (३१) यांचा समावेश आहे. १,१९,७५४ बिटकॉइन्सची चोरी करण्यासंदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहा वर्षांपूर्वी म्हणजे २०१६मध्ये हाँगकाँग येथील बिटफाइनेक्स या क्रिप्टो एक्सचेंजमधून त्यांनी ही रक्कम लांबवली होती. 

बिटफाइनेक्स हे जगातल्या सर्वात मोठ्या व्हर्च्युअल करन्सी एक्सचेंजमधील एक मानले जाते. या चोरीमुळे या एक्सचेंजच्या प्रतिष्ठेला तर मोठा धक्का बसलाच, पण त्याच्या सुरक्षेविषयीही जगभरात शंका उपस्थित केल्या गेल्या. दोघा नवरा - बायकोला अटक झाली असली तरी ही चोरी (हॅकिंग) त्यांनी स्वत:च केली, की कोणाच्या मदतीने त्यांनी हा डल्ला मारला, याबाबत अजून काहीही जाहीर करण्यात आलेलं नाही. क्रिप्टोकरन्सी, व्हर्च्युअल करन्सी सुरक्षित आहे की नाही, याबाबत जगात आजही मोठ्या प्रमाणात शंका व्यक्त केल्या जात असताना या चोरीमुळे क्रिप्टोकरन्सीविषयी लोकांच्या मनात मोठा संभ्रम निर्माण झाला होता आणि केवळ या एका चोरीमुळे क्रिप्टोकरन्सीची जागतिक किंमत तब्बल वीस टक्क्यांनी घसरली होती. लिचटेन्सटाइन आणि मॉर्गन यांना नुकतंच फेडरल कोर्टासमोर हजर करण्यात आलं. त्यावेळी न्यायाधीशांनी लिचटेन्सटाइनची पाच मिलियन डॉलरच्या  बॉण्डवर, तर मॉर्गनची तीन मिलियन डॉलरच्या बॉण्डवर जामिनावर सुटका केली.

अमेरिकेच्या डेप्युटी ॲटर्नी जनरल लिसा मोनाको यांनी यासंदर्भात म्हटलं आहे की, ही चोरी करण्यासाठी आरोपी दाम्पत्यानं अतिशय जटील अशा जाळ्याचा उपयोग केला. चोरी केलेली डिजिटल करन्सी लिचटेन्सटाइन यांच्या डिजिटल वॉलेटमध्ये ट्रान्सफर करण्यापूर्वी तब्बल दोन हजार ट्रॅन्झॅक्शन्समधून हे पैसे फिरवण्यात आले. त्यानंतर गेल्या पाच वर्षांत वॉलेटमधून २५ हजार बिटकॉइन काढण्यात आले. पण, त्यासाठीही ट्रॅन्झॅक्शन्सची अतिशय जटील अशी साखळी तयार करण्यात आली. डिजिटल चोऱ्या करण्यामध्ये हे दाम्पत्य अतिशय माहीर मानलं जातं. लिचटेन्सटाइन हा ‘डच’ या टोपणनावानंही ओळखला जातो.  आपण ‘टेक एंटरप्रेन्योर’ आहोत, असा आपला परिचय तो सोशल मीडियावर करतो, तर लिंक्डइन पेजेसनुसार हीथर मॉर्गन ही एक ‘सिरियल एंटरप्रेन्योर’ आणि ‘कॉमेडिक रॅपर’ आहे.

असं पकडलं भामट्या दाम्पत्याला !..आपण पकडले जाऊ नये, यासाठी या दाम्पत्यानं भरपूर काळजी घेतली होती. पण आपल्याच एका छोट्याशा चुकीनं ते पकडले गेले. या दाम्पत्याने चोरलेले बिटकॉइन्स विकून मिळालेली रक्कम आपल्या अकाऊंटमध्ये जमा केली. या पैशांच्या माध्यमातून त्यांनी सोनं, काही टोकन्स, वॉलमार्टचं गिफ्ट कार्ड इत्यादी गोष्टी खरेदी केल्या. या दोघांनी जे व्यवहार केले, त्याचा तपास करुन अधिकाऱ्यांनी ‘डेस्टिनेशन सोर्स’चा छडा लावला आणि अत्यंत किचकट अशी ही चोरी पकडली गेली!

टॅग्स :Bitcoinबिटकॉइन