अमेरिकेच्या B-2 बॉम्बर्सचा इराणवर महाहल्ला! २००० पाउंडचे ६४ बॉम्ब डागून क्षेपणास्त्र तळ केले उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 01:43 IST2026-03-02T01:42:31+5:302026-03-02T01:43:28+5:30

US B-2 stealth bomber Iran attack : 'ऑपरेशन एपिक फ्यूरी' अंतर्गत अमेरिकेच्या ४ B-2 स्टील्थ बॉम्बर्सनी इराणमधील बॅलिस्टिक मिसाईल सेंटर्सवर २००० पाउंडचे बॉम्ब डागले आहेत

US B-2 bombers launch massive attack on Iran! Destroyed missile base by dropping 64 2000 pound bombs | अमेरिकेच्या B-2 बॉम्बर्सचा इराणवर महाहल्ला! २००० पाउंडचे ६४ बॉम्ब डागून क्षेपणास्त्र तळ केले उद्ध्वस्त

अमेरिकेच्या B-2 बॉम्बर्सचा इराणवर महाहल्ला! २००० पाउंडचे ६४ बॉम्ब डागून क्षेपणास्त्र तळ केले उद्ध्वस्त

अमेरिकेने इराणविरुद्धच्यायुद्धात आपल्या सर्वात घातक शस्त्राचा वापर केला आहे. अमेरिकेच्या चार B-2 स्पिरिट स्टील्थ बॉम्बर्सनी थेट अमेरिकेतून उड्डाण करून इराणमधील भूमिगत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र केंद्रांवर भीषण हल्ला केला. या मोहिमेत २००० पाउंड वजनाचे डझनभर बॉम्ब वापरण्यात आले असून, इराणची प्रत्युत्तर देण्याची क्षमता पूर्णपणे मोडीत काढल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.

B-2 बॉम्बर्स हे विमान रडारच्या नजरेत येत नाही. चार B-2 बॉम्बर्सनी ६४ पेक्षा जास्त GBU-31 Joint Direct Attack Munitions (JDAM) बॉम्ब डागले. हे बॉम्ब जीपीएस-गाईडेड असून अत्यंत अचूक मारा करण्यासाठी ओळखले जातात.

अंडरग्राउंड फॅसिलिटी लक्ष्य
इराणने जमिनीच्या आत खोलवर लपवलेले बॅलिस्टिक मिसाईल्स आणि त्यांचे लाँचर्स या हल्ल्यात पूर्णपणे नष्ट झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेने याच बॉम्बर्स विमानांचा वापर करून इराणच्या अण्वस्त्रांची साईट नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. 

अमेरिकन सेंट्रल कमांडच्या मते, इराणचे अण्वस्त्र बनवण्याचे मार्ग आधीच बंद करण्यात आले होते, आता या हल्ल्यामुळे त्यांची पारंपरिक लष्करी ताकदही संपवण्यात आली आहे. हे बॉम्बर्स कोठेही न थांबता अमेरिकेतून इराणला पोहोचले आणि हल्ला करून पुन्हा माघारी फिरले, जे अमेरिकेच्या अफाट हवाई शक्तीचे दर्शन घडवते.

Web Title : अमेरिकी बी-2 बमवर्षकों ने ईरान पर हमला किया, मिसाइल स्थल नष्ट

Web Summary : अमेरिकी बी-2 बमवर्षकों ने ईरान के मिसाइल स्थलों पर भीषण हमला किया। 64 से अधिक जीपीएस-निर्देशित बमों ने भूमिगत सुविधाओं को नष्ट कर दिया, जिससे ईरान की सैन्य क्षमता कमजोर हो गई। इस मिशन ने अमेरिकी हवाई शक्ति का प्रदर्शन किया।

Web Title : US B-2 Bombers Strike Iran, Destroy Missile Site with Massive Bombing

Web Summary : US B-2 bombers, unseen by radar, launched a devastating attack on Iranian missile sites. Over 64 GPS-guided bombs destroyed underground facilities, crippling Iran's military capabilities. The mission showcased US air power, eliminating nuclear and conventional military threats.