US Air Strike In Syria : आता सीरियात अमेरिकेचा मोठा हल्ला, 35 ठिकानांवर बॉम्बिंग; 90 हून अधिक 'प्रिसीजन म्यूनिशन'चा वापर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 11:56 IST2026-01-11T11:55:10+5:302026-01-11T11:56:33+5:30
"जे कुणी आमच्या सैनिकांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करतील, त्यांना जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून शोधून संपवले जाईल," असा इशाराही CENTCOM ने दिला आहे.

US Air Strike In Syria : आता सीरियात अमेरिकेचा मोठा हल्ला, 35 ठिकानांवर बॉम्बिंग; 90 हून अधिक 'प्रिसीजन म्यूनिशन'चा वापर
अमेरिकन सेंट्रल कमांडने (CENTCOM) सीरियातील इस्लामिक स्टेटच्या अर्थात ISIS च्या ३५ हून अधिक ठिकाणांवर जबरदस्त बॉम्बिंग करत ते उद्ध्वस्त केले आहेत. 'ऑपरेशन हॉकआय स्ट्राईक'अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. हे हल्ले अमेरिकन वेळेनुसार दुपारी १२:३० च्या सुमारास करण्यात आले. अशी माहिती CENTCOM ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर दिली.
"...त्यांना जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून शोधून संपवले जाईल" -
यासंदर्भात बोलताना, "ही कारवाई म्हणजे, अमोरिकेची दहशतवादाविरोधातील कटिबद्धता आहे. अमेरिकन सैनिकांवर आणि सहकारी दलांवर होणारे हल्ले रोखणे, भविष्यातील धोके संपवणे आणि या भागात सुरक्षितता प्रस्तापित करणे, हा या मोहिमेमागचा उद्देश असल्याचे CENTCOM ने म्हटले आहे. एवढेच नाही तर, "जे कुणी आमच्या सैनिकांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करतील, त्यांना जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून शोधून संपवले जाईल," असा इशाराही CENTCOM ने दिला आहे.
खरे तर ही मोहीम सीरियातील पलमायरा येथे ISIS ने केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात सुरू झाली आहे. त्या हल्ल्यात आयोवा नॅशनल गार्डचे दोन सार्जंट आणि एका अमेरिकन नागरिकाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार १९ डिसेंबर २०२५ रोजी हे ऑपरेशन सुरू झाले.
९० हून अधिक Precision Munitions चा वापर -
CNN च्या वृत्तानुसार, या मोहिमेत अमेरिकेने ९० हून अधिक अचूक मारा करणाऱ्या शस्त्रांचा (Precision Munitions) वापर केला आणि ३५ हून अधिक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत दोन डझनहून अधिक लढाऊ विमाने सहभागी झाली होती. या हल्ल्यांने सीरियातील दहशतवादी नेटवर्कला मोठा हादरा बसला आहे.