America China Tension: हे कशाचे संकेत...! बोफोर्स चीनवर रोखल्यानंतर अमेरिकेकडून महाविनाशी बॉम्बर तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 06:17 PM2021-10-21T18:17:36+5:302021-10-21T18:18:27+5:30

America China War Tension rise: चीनने तैवान आणि भारताच्या सीमेवर शेकडो लढाऊ विमाने तैनात केली आहेत. कोरोना काळात अमेरिकेने बी-52 हे बॉम्ब वर्षाव करणारे विमान 2020 मध्ये तैनात केले होते.

us air force b1 bombers deploy to diego garcia near india amid China LAC tension | America China Tension: हे कशाचे संकेत...! बोफोर्स चीनवर रोखल्यानंतर अमेरिकेकडून महाविनाशी बॉम्बर तैनात

America China Tension: हे कशाचे संकेत...! बोफोर्स चीनवर रोखल्यानंतर अमेरिकेकडून महाविनाशी बॉम्बर तैनात

Next

गेल्या वर्षभरापासून चीन (China) भारतीय सीमेवर म्हणजेच एलएसीवर (LAC) मोठी जमवाजमव करत आहे. आधी कधीही असे घडले नाही, असे रस्ते, लढाऊ विमानांचे तळ बांधणे आणि मिसाईल, विमानांसह सैनिकांची तैनाती आदी करत आहे. हे कशाचे संकेत आहेत. चीनचे धोकादायक पाऊल पाहून भारतानेही सीमेवर राफेल लढाऊ विमानांसह बोफोर्स तोफांचा जत्थाच्या जत्था तैनात केला आहे. 

यापेक्षा अमेरिकेचे (America Bomber) पाऊल सर्वात खतरनाक आहे. चिनी ड्रॅगनच्या दादागिरीपासून निपटण्यासाठी अमेरिकेने 15 वर्षांनी महाविनाशी बॉम्बर भारताच्या अगदी जवळ तैनात केले आहे. महाविनाशी समजले जाणारे असे अमेरिकेचे B-1B लांसर बॉम्बर विमान डियागो गार्सिया या नौदलाच्या बेटावर तैनात करण्यात आले आहे. हा तळ भारतापासून 1500 समुद्री मैलांवर आहे. ब्रिटनच्या मालकीचा असलेले हे बेट अमेरिका लष्करी तळ म्हणून वापरत आहे. हिंदी महासागरात चीनच्या कारवाया वाढू लागल्या आहेत. तैवानवरून चीनने खुली धमकी दिली आहे. तसेच भारताविरोधात मोठ्या प्रमाणावर सीमेवर शस्त्रास्त्रे आणि सैनिकांची जमवाजमव सुरु केली आहे. 

बी 1 बी लांसर ही विमाने 2006 मध्ये अमेरिकेने या तळावर तैनात केली होती. आता 200 हून अधिक सैनिक बी-1 सोबत या तळावर आले आहेत. हवाई कारवायांमध्ये ते तरबेज आहेत. हे विमान  2400 किमीवरून मारा करू शकते. अमेरिका डियागो गार्सियाहून बी-1, बी-52 व बी-2 स्‍टील्‍थ बॉम्बर विमाने हाताळते. इथूनच अफगाणिस्तान आणि पश्चिम आशियावर कारवाया केल्या जातात. ही विमाने आमची मारक क्षमताच नाही तर आमच्या सहकारी देशांची सुरक्षा देखील वाढवित आहेत, असे अमेरिकी सैन्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 

चीनने तैवान आणि भारताच्या सीमेवर शेकडो लढाऊ विमाने तैनात केली आहेत. कोरोना काळात अमेरिकेने बी-52 हे बॉम्ब वर्षाव करणारे विमान 2020 मध्ये तैनात केले होते. तेव्हा अमेरिकेचा इराण आणि भारताचा चीनसोबत तणाव वाढला होता.

Web Title: us air force b1 bombers deploy to diego garcia near india amid China LAC tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app