शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
2
Top Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
3
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
4
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
5
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
6
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
7
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
8
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
9
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
10
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
11
हृदयद्रावक! गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद; काम न मिळाल्याने शेफची आत्महत्या
12
एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... 
13
पाकिस्तानला दुबईचा दणका! १७ एप्रिलपर्यंत २ अब्ज डॉलर्स परत करा; युएईच्या अल्टिमेटमने शाहबाज शरीफ सरकार हादरले
14
आपने केलेल्या कारवाईनंतर पहिल्यांदाच बोलले राघव चड्डा, म्हणाले, ‘’माझ्या मौनाला…” 
15
"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा!
16
सोने-प्लॅटिनमच्या आयातीवर कडक निर्बंध! आता 'लायसन्स'शिवाय इंपोर्ट अशक्य; दागिन्यांच्या किमती वाढणार?
17
भारत-पाकिस्तानच्या पडद्याआड चर्चा सुरू! 'ट्रॅक-2' बैठकीत दोन्ही देश आमनेसामने, कारण काय...
18
Numerology: तुमचा स्वभाव 'बोल्ड' आहे की लाजाळू? जन्मतारखेनुसार ओळखा बलस्थान,व्यक्तिमत्त्वाला द्या झळाळी!
19
नाशिकमध्ये हायप्रोफाईल ब्लॅकमेलिंग; जेष्ठ व्यक्तीच्या टॅबमधील 'त्या' अश्लील व्हिडिओसाठी १२ लाखांची खंडणी
20
Ashok Kharat : "कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती"; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 11:04 IST

US Military News: अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी आर्मी चीफ जनरल रैंडी जॉर्ज यांना तात्काळ निवृत्ती घेण्याचे आदेश दिले आहेत. इराण युद्धाच्या रणधुमाळीत हा निर्णय का घेतला?

इराणसोबत सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या दरम्यान अमेरिकेने आपल्या लष्करी नेतृत्वात मोठा बदल केला आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी आर्मी चीफ ऑफ स्टाफ जनरल रैंडी जॉर्ज यांना तात्काळ निवृत्त होण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्प प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे पेंटागनमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

जनरल रैंडी जॉर्ज यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत होता, मात्र त्यांना मुदतीपूर्वीच पद सोडण्यास भाग पाडले गेले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ट्रम्प प्रशासन आणि संरक्षण मंत्री हेगसेथ यांना लष्कराच्या सर्वोच्च पदी अशी व्यक्ती हवी आहे, जी त्यांच्या विचारसरणीनुसार काम करेल. रैंडी जॉर्ज यांची नियुक्ती जो बायडेन यांच्या काळात झाली होती आणि ते माजी संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांचे निकटवर्तीय मानले जात होते, हे त्यांच्या गच्छंतीचे एक मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांनी इराणवर लष्करी हल्ला करण्यास विरोध केल्याचेही सांगितले जात आहे. यामुळे त्यांना जबरदस्तीने निवृत्त होण्यास लावले जात आहे. 

इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर बदलहा बदल अशा वेळी झाला आहे जेव्हा अमेरिकन सैन्य इराणविरुद्ध मोठ्या लष्करी मोहिमेत गुंतलेले आहे. युद्धाच्या काळात लष्करी प्रमुखाला बदलणे ही एक असामान्य घटना मानली जाते. पेंटागनचे प्रवक्ते शॉन पार्नेल यांनी या निवृत्तीची पुष्टी करताना म्हटले की, "जनरल जॉर्ज यांच्या दशकांच्या सेवेबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत, परंतु आता नेतृत्वात बदल करण्याची वेळ आली आहे."

नवे लष्करी प्रमुख कोण?रैंडी जॉर्ज यांच्यानंतर आता जनरल क्रिस्टोफर लानेव्ह अमेरिकन लष्कराची धुरा सांभाळण्याची शक्यता आहे. लानेव्ह हे सध्या व्हाईस चीफ ऑफ स्टाफ असून ते हेगसेथ यांचे विश्वासू मानले जातात.

English
हिंदी सारांश
Web Title : US Army Chief abruptly retired amid Iran tensions: Trump decision.

Web Summary : Amid Iran tensions, the US Army Chief, General Randy George, was abruptly retired by order of Defense Secretary Pete Hegseth. The move, seen as a Trump administration decision to install a leader aligned with their views, has caused upheaval within the Pentagon. A replacement is expected soon.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरWarयुद्धIranइराणAmericaअमेरिका