शहरं
Join us  
Trending Stories
1
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
2
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
3
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
4
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
5
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
6
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
7
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
8
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
9
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
10
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
11
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
12
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
13
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
14
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
15
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
16
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
17
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
18
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
19
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्य!...म्हणून चक्क पत्नीनं पतीकडे मागितला तलाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2019 11:23 IST

बऱ्याचदा पती-पत्नीमध्ये प्रेमाची भावना शिल्लक न राहिल्यानं घटस्फोट किंवा तलाकसारख्या घटना घडतात.

नवी दिल्ली- बऱ्याचदा पती-पत्नीमध्ये प्रेमाची भावना शिल्लक न राहिल्यानं घटस्फोट किंवा तलाकसारख्या घटना घडतात. परंतु पती जीवापाड प्रेम करत असल्यानं पत्नीनं तलाक मागितल्याचं कधी ऐकलं आहे, परंतु अशी घटना घडली आहे. संयुक्त अरब अमिराती (यूएई)मध्ये एका विवाहित महिलेनं विचित्र कारण देत तलाकची मागणी केली आहे.पती माझ्यावर जीवापाड प्रेम करतो. त्याच्या या प्रेमाच्या कडेलोटामुळे माझा जीव गुदमरतो. त्यामुळे माझं आयुष्यच नरक झालं आहे, त्यामुळे मला तलाक हवा असल्याचं त्या महिलेनं सांगितलं आहे. यूएईतल्या एका महिलेनं शरिया न्यायालयात सांगितलं की, लग्नाच्या वर्षानंतरच पतीला तलाक द्यायचा होता. कारण तो माझ्यावर जीवापाड प्रेम करतो. पतीच्या या अतीव प्रेमामुळे माझा जीव घुसमटतो, पती घराची सफाई करण्यातही माझी मदत करतो. पतीच्या या व्यवहारानं माझं जीवन नरक बनलं आहे. महिला पुढे म्हणाली, मी पतीवर नाराज होते. परंतु पती एवढा रोमँटिक आहे की, मी एखादी चूक केल्यास मला लगेचच माफ करतो आणि माझ्यासाठी गिफ्ट घेऊन येतो. मला भांडणारा आणि चर्चा करताना पती हवा आहे. असं टेन्शनमुक्त जीवन मला जगायचं नाही. न्यायालयानं पतीच्या मागणीनंतर खटल्याच्या सुनावणीला स्थगिती दिली असून, पती-पत्नीला समुपदेशनासाठी वेळ दिला आहे.