Video: ‘जम्मू-काश्मीरचे बजेट IMF च्या मदतीपेक्षा जास्त’, UN मध्ये भारताने PAK ची हवा काढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 12:33 IST2026-02-26T12:32:36+5:302026-02-26T12:33:21+5:30

UN Human Rights Council: संयुक्त राष्ट्रांच्या 55व्या बैठकीत भारताच्या फर्स्ट सेक्रेटरी अनुपमा सिंह यांनी केली पाकिस्तान बोलती बंद!

UN Human Rights Council: 'Jammu and Kashmir's budget is more than the aid received from IMF', India raises PAK issue in UN | Video: ‘जम्मू-काश्मीरचे बजेट IMF च्या मदतीपेक्षा जास्त’, UN मध्ये भारताने PAK ची हवा काढली

Video: ‘जम्मू-काश्मीरचे बजेट IMF च्या मदतीपेक्षा जास्त’, UN मध्ये भारताने PAK ची हवा काढली

UN Human Rights Council: संयुक्त राष्ट्रांच्या (UN) मानवाधिकार परिषदेच्या 55व्या अधिवेशनात भारतानेपाकिस्तान आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (OIC) यांच्याकडून जम्मू-काश्मीरविषयी मांडल्या जाणाऱ्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या फर्स्ट सेक्रेटरी अनुपमा सिंह यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पाकिस्तानकडून करण्यात येणारे आरोप हे खोटे आणि दिशाभूल करणारे असून, OIC ही पाकिस्तानच्या इशाऱ्यावर काम करणारी संघटना बनली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

OIC पाकिस्तानची बाहुली...

संयुक्त राष्ट्रांच्या या बैठकीत पाकिस्तानने पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. मात्र भारताने तथ्ये आणि पुराव्यांच्या आधारे ठोस उत्तर देत पाकिस्तानसह OICलाही आरसा दाखवला. हाय-लेव्हल सेगमेंटमध्ये भारताच्या वतीने Right of Reply वापरताना अनुपमा सिंग म्हणाल्या, पाकिस्तान आणि OIC कडून करण्यात येणारे सर्व आरोप आम्ही पूर्णपणे फेटाळतो. OIC ही पाकिस्तानच्या हातातली बाहुली बनली असून, त्याच्या राजकीय फायद्यासाठी बोलत आहे. हा प्रोपेगंडा केवळ द्वेषातून प्रेरित आहे.

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, जम्मू-काश्मीरचे भारतात विलिनीकरण हे 1947 च्या इंडियन इंडिपेंडन्स अ‍ॅक्ट आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत पूर्णपणे कायदेशीर होते. हे वास्तव कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही. खरी समस्या म्हणजे पाकिस्तानचा भारतीय प्रदेशांवर असलेला बेकायदेशीर कब्जा, जो त्याने तात्काळ सोडावा, अशी मागणीही भारताने केली.

जम्मू-काश्मीरमधील विकास पाकिस्तानला खटकतो

अनुपमा सिंग यांनी जम्मू-काश्मीरमधील अलीकडील निवडणुकांचा उल्लेख करत सांगितले की, तिथे विक्रमी मतदान झाले असून, यावरून स्पष्ट होते की, स्थानिक नागरिकांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि हिंसेच्या विचारसरणीला नकार दिला आहे. जनता आता विकास आणि लोकशाहीच्या मार्गावर विश्वास ठेवत आहे. पाकिस्तानवर टोला लगावत त्यांनी चिनाब रेल्वे पुलाचे उदाहरण दिले. हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असून गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये सुरू करण्यात आला. किंवा कदाचित जम्मू-काश्मीर राज्याचे बजेट पाकिस्तानला मिळालेल्या अलीकडील IMF बेलआउट पॅकेजपेक्षा दुप्पट असल्याची वस्तुस्थिती त्यांना स्वीकारता येत नसेल.

Web Title : कश्मीर पर UN में भारत ने पाकिस्तान को लताड़ा, विकास पर ज़ोर दिया।

Web Summary : भारत ने यूएनएचआरसी में कश्मीर पर पाकिस्तान के आरोपों का जोरदार खंडन किया और ओआईसी को उसकी कठपुतली बताया। भारत ने रिकॉर्ड मतदान और चिनाब पुल जैसी विकास परियोजनाओं पर प्रकाश डाला, साथ ही कहा कि जम्मू-कश्मीर का बजट पाकिस्तान के आईएमएफ बेलआउट से अधिक है। पाकिस्तान के अवैध कब्जे की भी निंदा की गई।

Web Title : India Slams Pakistan at UN Over Kashmir; Highlights Development.

Web Summary : India strongly refuted Pakistan's Kashmir allegations at the UNHRC, calling OIC its puppet. India highlighted record voter turnout and development projects like the Chenab bridge, noting J&K's budget exceeds Pakistan's IMF bailout. Pakistan's illegal occupation was also condemned.