युक्रेनने रशियाला दिला जबर धक्का, हेरगिरी करणारं विमान पाडलं, हजारो कोटींमध्ये होती किंमत 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 11:24 PM2024-01-15T23:24:22+5:302024-01-15T23:24:38+5:30

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध जवळपास दोन वर्षे झाली तरी थांबलेले नाही. दरम्यान, रविवारी रात्री युक्रेनने रशियाला जबद धक्का दिला आहे. युक्रेनने एका नियोजनबद्ध मोहिमेमध्ये रशियाचं तब्बल २७९२ कोटी रुपये किंमत असलेलं एक हेरगिरी करणारं विमान पाडलं.

Ukraine gave a big shock to Russia, shot down a spy plane, the price was in thousands of crores | युक्रेनने रशियाला दिला जबर धक्का, हेरगिरी करणारं विमान पाडलं, हजारो कोटींमध्ये होती किंमत 

युक्रेनने रशियाला दिला जबर धक्का, हेरगिरी करणारं विमान पाडलं, हजारो कोटींमध्ये होती किंमत 

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध जवळपास दोन वर्षे झाली तरी थांबलेले नाही. दरम्यान, रविवारी रात्री युक्रेनने रशियाला जबद धक्का दिला आहे. युक्रेनने एका नियोजनबद्ध मोहिमेमध्ये रशियाचं तब्बल २७९२ कोटी रुपये किंमत असलेलं एक हेरगिरी करणारं विमान पाडलं. बीबीसीने युक्रेनी लष्कराचे प्रमुख जनरल वलेरी जालुजनी यांच्या हवाल्याने सांगितले की, हवाई दलाने ए-५० या लांब पल्ल्याच्या रडारचा शोध घेणारे विमान आणि एका इल्युशिन आयएल-२२ एअर कंट्रोल सेंटरला नष्ट केले. 

सोव्हिएत काळामध्ये ए-५० विमानामध्ये क्षेपणास्त्र आणि शत्रूच्या जेट विमानांचा शोध घेण्याची क्षमता आहे. या हवाई कमांड सेंटरच्या रूपात वापर केला जाऊ शकतो. बीबीसीने सांगितले की, संभवत: रशियाजवळ सहा ऑपरेशन ए-५० सेवेत आहे. डिफेन्स थिंक टँक रशियाच्या एअर वॉर स्पेशालिस्ट जस्टिन ब्रोंक यांनी बीबीसीला सांगितले की, जर दुजोरा दिला गेला तर ए-५० विमान गमावणं हे रशियासाठी महत्त्वपूर्ण आणि लाजिरवाणं नुकसान आहे. 

मात्र रशियाच्या अधिकाऱ्यांनी हल्ल्याबाबत कुठलीही माहिती नसल्याचे सांगत हे वृत्त फेटाळून लावले.  मात्र प्रमुख रशियन टिप्पणीकारांनी सांगितले की, ए-५० चं नुकसान या युद्धामध्ये खूप अर्थपूर्ण असेल. तर युक्रेनियन प्रसारमाध्यमांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे विमान खरोखरच पाडण्यात आल्याचे सांगितले.  

Web Title: Ukraine gave a big shock to Russia, shot down a spy plane, the price was in thousands of crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.