ट्विटरचा पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक, विविध दूतावासांचे ट्विटर हँडल ब्लाॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 12:30 IST2022-06-29T12:30:29+5:302022-06-29T12:30:51+5:30
या दूतावासांमधून भारतविराेधी कारवाया सुरू असल्याचा अहवाल सुरक्षा यंत्रणांनी सरकारला दिला हाेता. तसेच खाेट्या बातम्यादेखील त्यावरून माेठ्या प्रमाणावर पाेस्ट करण्यात येत हाेत्या.

ट्विटरचा पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक, विविध दूतावासांचे ट्विटर हँडल ब्लाॅक
इस्लामाबाद : भारताने पाकिस्तानात जाऊन सर्जिकल स्ट्राईक केला हाेता. आता पाकिस्तानवरट्विटरने डिजिटल स्ट्राईक केला आहे. भारताने संयुक्त राष्ट्र, तुर्की, इराण आणि इजिप्तमधील पाकिस्तानी दूतावासाचे अधिकृत ट्विटर हँडल ब्लाॅक केले आहेत. भारत सरकारच्या सूचनेवरून ट्विटरने ही कारवाई केली आहे.
या दूतावासांमधून भारतविराेधी कारवाया सुरू असल्याचा अहवाल सुरक्षा यंत्रणांनी सरकारला दिला हाेता. तसेच खाेट्या बातम्यादेखील त्यावरून माेठ्या प्रमाणावर पाेस्ट करण्यात येत हाेत्या. डिजिटल फाॅरेन्सिक रिसर्च अँड ॲनालिटिक्स सेंटरच्या अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार, ट्विटरवर पाकिस्तानातून अनेक बनावट खाती तयार करण्यात आली आहेत. त्यातून भारतातील प्रतिष्ठित संस्थाविराेधात अपप्रचार करण्यात येत असून, ठराविक अजेंडा घेऊन हॅशटॅग चालविण्यात येत असल्याचे आढळले आहे. भारताची बदनामी करण्याच्या हेतूनेच ही खाती बनविली हाेती. त्यांचे पडद्यामागील सूत्रधार संबंधित दूतावासात हाेते. त्यामुळेच ही कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले.