बगदादमध्ये मोठा आत्मघातकी हल्ला; 20 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 04:07 PM2021-01-21T16:07:28+5:302021-01-21T16:20:09+5:30

Suicide Attack in Central Baghdad : जखमींमधील अनेकांची प्रकृती ही अत्यंत गंभीर आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Twin Suicide Bombings Kill 20, Injure 40 In Baghdad Market | बगदादमध्ये मोठा आत्मघातकी हल्ला; 20 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी 

बगदादमध्ये मोठा आत्मघातकी हल्ला; 20 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी 

googlenewsNext

इराकची राजधानी बगदाद (Baghdad) पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरली आहे. बगदादमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 20 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन हल्ले करण्यात आले आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती ही अत्यंत गंभीर आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल बगदादच्या कमर्शियल सेंटरमध्ये हे दोन स्फोट झाले आहेत. हे आत्मघातकी हल्ले असल्याची माहिती मिळत आहे. हा स्फोट इतका मोठा होता की याचा आवाज हा तायारान स्वायरपर्यंत ऐकू आला. लोकांची जास्त गर्दी असलेल्या भागात हा आत्मघातकी हल्ला करण्यात आला आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारलेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

गेल्या वर्षी बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला झाला होता. या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले होते. तीन रॉकेटचा हल्ला करण्यात आल्याने या ठिकाणी वाहनांना आग लागली. यामध्ये काही टॉप कमांडरचा मृत्यू झाला असून अनेक सैनिक जखमी झाले होते. बगदादमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर इराण समर्थक मिलिशियाकडून नव वर्षाच्या पूर्वसंध्येला हल्ला करण्यात आला होता. अमेरिकेसोबत तणाव निर्माण झाल्यानंतर हा हल्ला करण्यात आला होता.


 

Web Title: Twin Suicide Bombings Kill 20, Injure 40 In Baghdad Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.