शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांचा 'डबल गेम'! इराणसोबत चर्चेच्या प्रस्तावामध्ये १०,००० अतिरिक्त सैनिकांची तैनात; पहिल्यांदाच 'ड्रोन बोटीं'चा रणांगणात वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 08:13 IST

US troops deployment Middle East 2026: ऑपरेशन एपिक फ्युरी: अमेरिकेने इराणविरुद्ध ड्रोन स्पीडबोट्स तैनात केल्या. १०,००० अतिरिक्त सैनिक मध्यपूर्वेत दाखल. ट्रम्प यांचा ६ एप्रिलपर्यंतचा अल्टीमेटम.

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आता एका निर्णायक वळणावर पोहोचले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले थांबवण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली असतानाच, दुसरीकडे मध्यपूर्वेत १०,००० अतिरिक्त सैनिक पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. पेंटागॉनने 'ऑपरेशन एपिक फ्युरी' अंतर्गत पहिल्यांदाच मानवरहित ड्रोन स्पीडबोट्स युद्धभूमीवर उतरवल्याची अधिकृत पुष्टी केली आहे.

पेंटागॉनने प्रथमच कबूल केले आहे की, इराणविरुद्धच्या कारवाईत अमेरिकेने 'ब्लॅकसी' कंपनीने बनवलेल्या GARC ड्रोन बोटी तैनात केल्या आहेत. या बोटींचा वापर प्रामुख्याने पाळत ठेवण्यासाठी केला जात असून गरज पडल्यास त्या 'कामीकाझे' (स्वयंघाती) हल्ले करण्यासाठीही सक्षम आहेत.

ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले थांबवण्याची मुदत १० दिवसांनी वाढवून ६ एप्रिल केली आहे. जर इराणने या काळात अटी मान्य केल्या नाहीत, तर त्यांचे पॉवर प्लांट्स पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.

८२ व्या एअरबोर्नची मोठी कुमकपेंटागॉन ३,००० हून अधिक पॅराट्रूपर्स मध्यपूर्वेत पाठवत आहे. यामुळे या भागात अमेरिकन सैनिकांची संख्या आता ६०,००० च्या पार जाणार आहे. या सैनिकांना इराणच्या खर्ग बेटावर ताबा मिळवण्यासाठी वापरले जाऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

इस्त्रायलचे तेहरानवर भीषण हल्लेइस्त्रायली हवाई दलाने गेल्या काही तासांत तेहरानमधील इराणच्या लष्करी पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणच्या क्षेपणास्त्र निर्मिती केंद्रांचे मोठे नुकसान झाल्याचे समजते.

युक्रेनची शस्त्रे मध्यपूर्वेकडे? रशिया-युक्रेन युद्धासाठी राखीव ठेवलेली काही प्रगत शस्त्रे आणि हवाई संरक्षण यंत्रणा (उदा. पेट्रिओट मिसाईल्स) आता मध्यपूर्वेतील तणाव पाहता तिथे वळवण्याचा विचार पेंटागॉन करत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's 'Double Game': Iran Talks and Military Buildup in Middle East

Web Summary : Amidst offering Iran talks with deadline, Trump prepares to deploy 10,000 troops to the Middle East. The US military is also deploying drone boats for surveillance and potential Kamikaze attacks. Israel reportedly struck Iranian military sites, and Patriot missiles might be diverted from Ukraine.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्ध