ट्रम्प यांचा 'डबल गेम'! इराणसोबत चर्चेच्या प्रस्तावामध्ये १०,००० अतिरिक्त सैनिकांची तैनात; पहिल्यांदाच 'ड्रोन बोटीं'चा रणांगणात वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 08:13 IST2026-03-27T08:12:34+5:302026-03-27T08:13:46+5:30

US troops deployment Middle East 2026: ऑपरेशन एपिक फ्युरी: अमेरिकेने इराणविरुद्ध ड्रोन स्पीडबोट्स तैनात केल्या. १०,००० अतिरिक्त सैनिक मध्यपूर्वेत दाखल. ट्रम्प यांचा ६ एप्रिलपर्यंतचा अल्टीमेटम.

Trump's 'double game'! 10,000 additional troops deployed in proposal for talks with Iran; 'drone boats' used in the battlefield for the first time | ट्रम्प यांचा 'डबल गेम'! इराणसोबत चर्चेच्या प्रस्तावामध्ये १०,००० अतिरिक्त सैनिकांची तैनात; पहिल्यांदाच 'ड्रोन बोटीं'चा रणांगणात वापर

ट्रम्प यांचा 'डबल गेम'! इराणसोबत चर्चेच्या प्रस्तावामध्ये १०,००० अतिरिक्त सैनिकांची तैनात; पहिल्यांदाच 'ड्रोन बोटीं'चा रणांगणात वापर

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आता एका निर्णायक वळणावर पोहोचले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले थांबवण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली असतानाच, दुसरीकडे मध्यपूर्वेत १०,००० अतिरिक्त सैनिक पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. पेंटागॉनने 'ऑपरेशन एपिक फ्युरी' अंतर्गत पहिल्यांदाच मानवरहित ड्रोन स्पीडबोट्स युद्धभूमीवर उतरवल्याची अधिकृत पुष्टी केली आहे.

पेंटागॉनने प्रथमच कबूल केले आहे की, इराणविरुद्धच्या कारवाईत अमेरिकेने 'ब्लॅकसी' कंपनीने बनवलेल्या GARC ड्रोन बोटी तैनात केल्या आहेत. या बोटींचा वापर प्रामुख्याने पाळत ठेवण्यासाठी केला जात असून गरज पडल्यास त्या 'कामीकाझे' (स्वयंघाती) हल्ले करण्यासाठीही सक्षम आहेत.

ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले थांबवण्याची मुदत १० दिवसांनी वाढवून ६ एप्रिल केली आहे. जर इराणने या काळात अटी मान्य केल्या नाहीत, तर त्यांचे पॉवर प्लांट्स पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.

८२ व्या एअरबोर्नची मोठी कुमक
पेंटागॉन ३,००० हून अधिक पॅराट्रूपर्स मध्यपूर्वेत पाठवत आहे. यामुळे या भागात अमेरिकन सैनिकांची संख्या आता ६०,००० च्या पार जाणार आहे. या सैनिकांना इराणच्या खर्ग बेटावर ताबा मिळवण्यासाठी वापरले जाऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

इस्त्रायलचे तेहरानवर भीषण हल्ले
इस्त्रायली हवाई दलाने गेल्या काही तासांत तेहरानमधील इराणच्या लष्करी पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणच्या क्षेपणास्त्र निर्मिती केंद्रांचे मोठे नुकसान झाल्याचे समजते.

युक्रेनची शस्त्रे मध्यपूर्वेकडे? 
रशिया-युक्रेन युद्धासाठी राखीव ठेवलेली काही प्रगत शस्त्रे आणि हवाई संरक्षण यंत्रणा (उदा. पेट्रिओट मिसाईल्स) आता मध्यपूर्वेतील तणाव पाहता तिथे वळवण्याचा विचार पेंटागॉन करत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

Web Title : ट्रम्प का 'डबल गेम': ईरान से वार्ता और मध्य पूर्व में सैन्य निर्माण

Web Summary : ईरान को बातचीत का प्रस्ताव देने के साथ ही ट्रम्प मध्य पूर्व में 10,000 सैनिक भेजने की तैयारी कर रहे हैं। अमेरिकी सेना ड्रोन नौकाओं को निगरानी और संभावित आत्मघाती हमलों के लिए तैनात कर रही है। इज़राइल ने ईरानी सैन्य ठिकानों पर हमला किया, और यूक्रेन से पैट्रियट मिसाइलें हटाई जा सकती हैं।

Web Title : Trump's 'Double Game': Iran Talks and Military Buildup in Middle East

Web Summary : Amidst offering Iran talks with deadline, Trump prepares to deploy 10,000 troops to the Middle East. The US military is also deploying drone boats for surveillance and potential Kamikaze attacks. Israel reportedly struck Iranian military sites, and Patriot missiles might be diverted from Ukraine.