शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे अमेरिकेचे नुकसान? या देशात अमेरिकी सैनिकांना हाकलून देण्याची वाढली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 16:12 IST

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयांचा पूर्ण जगावर परिणाम होत आहे. परिणामी, जर्मनीमध्ये तैनात असलेले सुमारे ४०,००० सैनिक मागे घेण्याची मागणी होत आहे. उजव्या विचारसरणीच्या पक्षाने चान्सलर मेर्ट्झ यांच्याकडे ही मागणी सुरू आहे. जर्मनीचे परराष्ट्र धोरण यापुढे अमेरिकेशी संलग्न असू नये, अशी मागणी सुरू आहे.

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून त्यांच्या निर्णयांनी मित्रराष्ट्रांमध्ये नाराजी पसरली आहे. याचे पडसाद आता जर्मनीमध्ये तीव्रपणे उमटत असून, तेथे तैनात असलेल्या ४०,००० अमेरिकन सैनिकांना देशाबाहेर काढण्याची आणि अमेरिकेचे लष्करी तळ नष्ट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि जर्मनीचे संबंध अत्यंत दृढ होते. मात्र, इराण युद्ध आणि 'नाटो'मधील अमेरिकेची मनमानी यामुळे जर्मनी आता वॉशिंग्टनपासून स्वतंत्र परराष्ट्र धोरण आखण्याच्या तयारीत आहे. जर्मनीतील 'अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी' या पक्षाने थेट अमेरिकन अण्वस्त्रे हटवण्याचा इशारा दिल्याने जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

इराणमध्ये आमचं सैन्य पाठवणार नाही; ऐन युद्धात इस्रायलनं केलेल्या घोषणेनं अमेरिका पडली एकाकी

अहवालानुसार, जर्मनीमध्ये ४०,००० हून अधिक अमेरिकन सैनिक तैनात आहेत. याव्यतिरिक्त, तेथे १२ हून अधिक लष्करी तळ आहेत. सध्या, जर्मनीचा रामस्टाईन हवाई तळ हा इराणवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करण्यासाठीचा तळ आहे. यामुळे, जर्मनीला भीती आहे की त्यांनाही लक्ष्य केले जाऊ शकते. या हवाई तळाच्या आसपास अमेरिकेचे इतके व्यापक नियंत्रण आहे की या परिसराला युरोपचे 'मिनी-अमेरिका' असेही म्हटले जाते.

मात्र, गेल्या वर्षभरात अमेरिका आणि जर्मनी यांच्यातील तणाव वाढत आहे. ट्रम्प जर्मनीमधून आपले सैन्य मागे घेण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणतेही ठोस विधान करण्यात आलेले नाही.सैन्य हटवण्याची मागणी पक्षाचे नेते टिनो चुपाना यांनी ४०,००० अमेरिकन सैनिकांना तात्काळ मायदेशी पाठवण्याची मागणी केली आहे.

अण्वस्त्रे आणि तळ जर्मनीतील अमेरिकेच्या मालकीच्या अणुसुविधा आणि लष्करी तळ नष्ट करून देश 'स्वतंत्र' करण्याची मागणी करण्यात आली आहे.

इराण युद्धाचा विरोध चान्सलर मेर्ट्झ यांनी अमेरिकेवर गंभीर आरोप केला आहे की, अमेरिकेने इराणमधील युद्ध संपवण्याऐवजी ते अधिक पेटवले आहे, ज्यामुळे जागतिक तणाव वाढला आहे.

मिनी-अमेरिका' धोक्यात जर्मनीतील 'रामस्टाईन हवाई तळ' हा सध्या अमेरिकेचा इराणवरील हल्ल्यांचा मुख्य केंद्र आहे. या तळावर अमेरिकेचे पूर्ण नियंत्रण असल्याने जर्मनीला स्वतःवर हल्ल्याची भीती वाटत आहे.

जानेवारी २०२५ मध्ये पदभार स्वीकारल्यापासून, ट्रम्प यांनी नाटोसह अनेक देशांशी गैरसोयीचे वर्तन केले आहे. मग ते कॅनडाच्या पंतप्रधानांना 'गव्हर्नर' म्हणणे असो किंवा झेलेन्स्कींवर जाहीरपणे टीका करणे असो. ट्रम्प यांनी युरोपीय प्रदेश असलेल्या ग्रीनलँडला आपल्यात सामील करून घेण्याची योजनाही आखली होती. या विरोधाला इतकी तीव्र प्रतिक्रिया आली की युरोपीय देशांनी त्याच्या संरक्षणासाठी सैन्य तैनात करण्यास सुरुवात केली. इराण युद्धानंतर परिस्थिती इतकी बिघडली की ट्रम्प यांनी नाटो देशांना 'भित्रे' म्हटले. इतकेच नाही, तर त्यांनी अलीकडेच जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटनच्या नेत्यांविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's decisions harm America? Demand to expel US troops grows.

Web Summary : Trump's decisions strain US-Germany ties. Calls grow to remove 40,000 US troops and dismantle bases amid Iran war fears. Germany eyes independent foreign policy.
टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प