ट्रम्प यांची कॅनडाला ५०% विमान शुल्काची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 06:16 IST2026-01-31T06:16:24+5:302026-01-31T06:16:47+5:30

US-Canada: कॅनडा निर्मित आणि अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या कोणत्याही कंपन्यांच्या विमानांवर ५० टक्के आयात शुल्क लावण्याची धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डो

Trump threatens 50% airline tariffs on Canada | ट्रम्प यांची कॅनडाला ५०% विमान शुल्काची धमकी

ट्रम्प यांची कॅनडाला ५०% विमान शुल्काची धमकी

वॉशिंग्टन -  कॅनडा निर्मित आणि अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या कोणत्याही कंपन्यांच्या विमानांवर ५० टक्के आयात शुल्क लावण्याची धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मिडीयाद्वारे गुरुवारी दिली. व्यापारयुद्धातील हा नवा टप्पा असून, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याशी सुरू असलेला वाद अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  याआधी, चीनसोबत नियोजित व्यापार करार पुढे नेल्यास कॅनडातून आयात होणाऱ्या वस्तूंवर १०० टक्के शुल्क लावण्याचा इशाराही दिला होता. जॉर्जियाच्या सॅव्हाना येथील गल्फस्ट्रीम एअरोस्पेसच्या जेट विमानांना प्रमाणपत्र देण्यास कॅनडाने नकार दिल्याचे प्रत्युत्तर म्हणून हा निर्णय घेतल्याचे ट्रम्प म्हणाले. 

Web Title : ट्रंप की कनाडा को विमानों पर 50% शुल्क की धमकी: व्यापार युद्ध

Web Summary : राष्ट्रपति ट्रम्प ने व्यापार विवाद के चलते कनाडाई विमानों पर 50% शुल्क लगाने की धमकी दी। इससे प्रधान मंत्री ट्रूडो के साथ तनाव बढ़ गया है। ट्रम्प ने गल्फस्ट्रीम जेट को प्रमाणित करने से कनाडा के इनकार को कारण बताया और कनाडाई वस्तुओं पर और शुल्क लगाने का संकेत दिया।

Web Title : Trump Threatens Canada with 50% Aircraft Tariffs Amid Trade Dispute

Web Summary : President Trump threatened a 50% tariff on Canadian aircraft due to a trade dispute. This escalates tensions with Prime Minister Trudeau. Trump cited Canada's refusal to certify Gulfstream jets as the reason, hinting at further tariffs on Canadian goods.