ट्रम्पना आता हवाय होर्मुझ, खार्ग बेटावर ताबा; आखातात तैनात होणार अमेरिकेची तिसरी युद्धनौका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 06:45 IST2026-03-21T06:44:55+5:302026-03-21T06:45:50+5:30

सध्या कुठे आहे? : ‘यूएसएस त्रिपोली’ नुकतीच सिंगापूरजवळील मलक्का सामुद्रधुनीत दिसली होती आणि त्यानंतर ती हिंदी महासागरातून उत्तर अरबी समुद्राकडे सरकत आहे.

Trump now wants to take control of Hormuz, Kharg Island Third US warship to be deployed in the Gulf | ट्रम्पना आता हवाय होर्मुझ, खार्ग बेटावर ताबा; आखातात तैनात होणार अमेरिकेची तिसरी युद्धनौका

ट्रम्पना आता हवाय होर्मुझ, खार्ग बेटावर ताबा; आखातात तैनात होणार अमेरिकेची तिसरी युद्धनौका

वॉशिंग्टन/दुबई : होर्मुज सामुद्रधुनी व तेलनिर्यातीचे महत्त्वाचे खार्ग बेट ताब्यात घेण्यास अमेरिकेची ‘यूएसएस त्रिपोली’ ही तिसरी युद्धनौका रवाना होत आहे. या नौकेवर २२०० प्रशिक्षित सैनिक आहेत. ‘यूएसएस बॉक्सर’ ही नौकाही तैनात होत आहे. या रणनीतीनुसार जगाच्या २० टक्के तेलपुरवठा साखळीवर अमेरिकेला नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. 

सध्या कुठे आहे? : ‘यूएसएस त्रिपोली’ नुकतीच सिंगापूरजवळील मलक्का सामुद्रधुनीत दिसली होती आणि त्यानंतर ती हिंदी महासागरातून उत्तर अरबी समुद्राकडे सरकत आहे.

‘यूएसएस त्रिपोली’ची युद्ध क्षमता -
ही युद्धनौका समुद्रामध्येच एक ‘मोबाइल लष्करी तळ’ म्हणून काम करू शकते. ही पारंपरिक युद्धनौकेपेक्षा वेगळी असून विमानवाहू जहाज आणि सैन्य वाहतूक जहाज (ॲम्फिबिअस) या दोन्हींची क्षमता यात आहे. सुमारे ८४४ फूट लांबीच्या या जहाजावर एफ-३५ बी स्टेल्थ लढाऊ विमाने, एमव्ही-२२ ओसप्रे हेलिकॉप्टर आणि एमएच-६० सीहॉक यासारखी प्रगत लष्करी साधने व छोट्या नौका तैनात आहेत. 

या युद्धनौकेचा खालचा भाग १० मीटर पाण्यात बुडाला असतो. ती किनाऱ्यापासून दूर खोल पाण्यात उभी असते. लष्करी विमानांचे उड्डाण व छाेट्या बोटींच्या मदतीने सैनिक व उपकरणे किनाऱ्याला पाठवणे शक्य होते. 

Web Title : ट्रम्प को होर्मुज, खर्ग पर नियंत्रण चाहिए; अमेरिका ने तीसरा युद्धपोत तैनात किया

Web Summary : अमेरिका होर्मुज और खर्ग द्वीप के पास तीसरा युद्धपोत, यूएसएस त्रिपोली तैनात कर रहा है। इस कदम का उद्देश्य उन्नत सैन्य संपत्ति और 2200 प्रशिक्षित कर्मियों का उपयोग करके वैश्विक तेल आपूर्ति के 20% को नियंत्रित करना है। युद्धपोत एक मोबाइल सैन्य अड्डे के रूप में कार्य कर सकता है।

Web Title : Trump Seeks Control of Hormuz, Kharg; US Deploys Third Warship

Web Summary : The US is deploying the USS Tripoli, a third warship, near Hormuz and Kharg Island. This move aims to control 20% of global oil supply, utilizing advanced military assets and 2200 trained personnel. The warship can act as a mobile military base.