ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याचा निर्णय मागे घेतला? सौदी, कतार, ओमाननं "महायुद्धाचा" धोका टाळला! दिलं मोठं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 10:39 IST2026-01-16T10:39:00+5:302026-01-16T10:39:39+5:30
सौदी अरेबियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे की, इराणवरील हल्ला संपूर्ण प्रदेशासाठी "विनाशकाराचा" मार्ग खुला करेल, असे ट्रम्प यांना सांगण्यात आले. तसेच, अधिकाऱ्यांनी या कुटनितीक मोहिमेला "बॉम्ब निकामी करणारी Sleepless night" असे केले.

ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याचा निर्णय मागे घेतला? सौदी, कतार, ओमाननं "महायुद्धाचा" धोका टाळला! दिलं मोठं आश्वासन
सौदी अरेबिया, कतार आणि ओमान यांच्या कुटनितीक प्रयत्नांमुळे अमेरिकेचा इराणवरील संभाव्य हल्ला टळल्याचे बोलले जात आहे. आखाती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिलेल्या माहिती नुसार, ट्रम्प यांना काही गोष्टी पटवून देण्यासाठी तिन्ही देशांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नांची पराकाष्टा केली. यामुळे इराणला त्यांची चांगली 'नियत' दाखवण्याची संधी मिळेल. महत्वाचे म्हणजे, अमेरिकेने इराणमधील निदर्शकांवरील दडपशाहीविरोधात लष्करी कारवाईची धमकी दिली होती. यानंतर, हा हस्तक्षेप करण्यात आला.
यानंतर, अमेरिकेला प्रत्युत्तर देत, तेहरानने आखातातील अमेरिकन लष्करी तळ आणि जहाजांवर प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली होती. तणाव एवढा वाढला होता की, कतारच्या अल-उदेद हवाई तळावरून अमेरिकन कर्मचाऱ्यांना काढरण्यात आले.
दरम्यान, आखाती देशांचा दबाव, तसेच इराण निदर्शकांना फाशी देणार नाही, अशा आश्वासनानंतर, ट्रम्प यांनी आपली भूमिका बदलली. यातच, हा प्रयत्न या प्रदेशातील "अनियंत्रित परिस्थिती" आणि गंभीर प्रत्युत्तरात्मक हल्ले रोखण्यासाठी करण्यात आला, असे सौदीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
आखाती देशांची 'Sleepless night'
एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, सौदी अरेबियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे की, इराणवरील हल्ला संपूर्ण प्रदेशासाठी "विनाशकाराचा" मार्ग खुला करेल, असे ट्रम्प यांना सांगण्यात आले. तसेच, अधिकाऱ्यांनी या कुटनितीक मोहिमेला "बॉम्ब निकामी करणारी Sleepless night" असे केले. आखाती देशांनी केवळ वॉशिंग्टनशीच संपर्क साधला असे नाही, तर आखातातील अमेरिकन तळांवर हल्ला केल्यास प्रादेशिक देशांशी असलेले संबंध कायमचे खराब होतील, असा इशाराही इराणला दिला आहे.
असा बदलला ट्रम्प यांचा पवित्रा... -
वारंवार धमक्यांनंतर, डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर आता अचानकपणे बदलला आहे. यासंदर्भात बोलताना ट्रम्प म्हणाले, "दुसऱ्या बाजूच्या अत्यंत महत्त्वाच्या सूत्रांकडून" आश्वासन मिळाले आहे की, इराण निदर्शकांना फाशी देणार नाही. या आश्वासनामुळे, अमेरिकेने लष्करी कारवाईचा पर्याय तात्पुरता बाजूला ठेवला आहे. तसेच, सौदीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, विश्वास मजबूत करण्यासाठी आणि अशीच परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी संवाद सुरू आहे.