अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 05:27 IST2025-10-25T05:25:56+5:302025-10-25T05:27:10+5:30
एकूण प्रणाली फसवणुकीने भरलेली असल्याने आमच्याविरोधात जे काही खटले दाखल करण्यात आले आहेत, ते आम्ही लढणार असल्याचे जाहीर केले.

अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
वॉशिंग्टन : एच वन-बी व्हिसाचे शुल्क १ लाख डॉलरपर्यंत वाढवण्यामागे अमेरिकेच्या कामगारांना प्राधान्य देण्याचा उद्देश आहे, असे ट्रम्प प्रशासनाने स्पष्ट करत एकूण प्रणाली फसवणुकीने भरलेली असल्याने आमच्याविरोधात जे काही खटले दाखल करण्यात आले आहेत, ते आम्ही लढणार असल्याचे जाहीर केले.
एच-वनबी व्हिसा प्रणाली ही दीर्घकाळापासून अमेरिकी कामगारांवर अन्याय करणारी आहे. अशा प्रणालीत सुधारणा करण्याची वेळ आली होती, म्हणून हे नवीन धोरण ट्रम्प यांनी लागू केले असे व्हाइट हाउसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेव्हिट यांनी स्पष्ट केले.