थरार...! तब्बल ३० मीटरपर्यंत विमानासारखा हवेत उडून थेट घरात शिरला भरधाव ट्रक, थोडक्यात बचावलं संपूर्ण कुटुंब; बघा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 21:49 IST2026-02-18T21:49:22+5:302026-02-18T21:49:52+5:30

स्थानिक माध्यमांशी बोलताना ब्रुडनोक म्हणाले, "एखादा ट्रक असा उडत येईल याचा मी कधी विचारही केला नव्हता. अचानक मोठा स्फोट झाला आणि घर हादरले. खाली जाऊन पाहिले तर घराचा समोरचा संपूर्ण भाग उद्ध्वस्त झाला होता."

Thrill A speeding truck flew into the house like a plane for 30 meters, the entire family narrowly escaped Watch VIDEO | थरार...! तब्बल ३० मीटरपर्यंत विमानासारखा हवेत उडून थेट घरात शिरला भरधाव ट्रक, थोडक्यात बचावलं संपूर्ण कुटुंब; बघा VIDEO

थरार...! तब्बल ३० मीटरपर्यंत विमानासारखा हवेत उडून थेट घरात शिरला भरधाव ट्रक, थोडक्यात बचावलं संपूर्ण कुटुंब; बघा VIDEO

अमेरिकेतील टायगार्ड येथून एका अत्यंत थरारक अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. यात, एक भरधाव ट्रक मातीच्या ढिगाऱ्यावरून उसळून, तब्बल ३० मीटरपर्यंत विमानासारखा हवेत उडत जाऊन थेट एका घरात शिरल्याचे दिसत आहे. सुदैवाने या अपघातातून संबंधित कुटुंब थोडक्यात बचावले आहे.

अपघाताचा थरार -
हा अपघात गेल्या शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडला. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ट्रक 'साउथवेस्ट स्कोल्स फेरी रोड'वरून पश्चिमेकडे जात होता. चालक अत्यंत बेजबाबदारपणे आणि वेगाने ट्रक चालवत होता. या संपूर्ण अपघाताचे फुटेज घराच्या दरवाजावर बसवलेल्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे. यात, ट्रक आधी एका मातीच्या ढिगाऱ्यावरून उडाला आणि एका रिटेनिंग वॉलला पार करत थेट घराच्या भिंतीवर जाऊन धडकल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

थेट बाथरूममध्ये शिरला ट्रक -
हा ट्रक डेव्हिड ब्रुडनोक यांच्या घराच्या तळमजल्यावरील बाथरूममध्ये शिरला. स्थानिक माध्यमांशी बोलताना ब्रुडनोक म्हणाले, "एखादा ट्रक असा उडत येईल याचा मी कधी विचारही केला नव्हता. अचानक मोठा स्फोट झाला आणि घर हादरले. खाली जाऊन पाहिले तर घराचा समोरचा संपूर्ण भाग उद्ध्वस्त झाला होता." सुदैवाने, अपघाता वेळी ब्रुडनोक, त्यांची पत्नी आणि तीन लहान मुले वरच्या मजल्यावर होते. यामुळे कुणालाही दुखापत झाली नाही.

चालकावर गुन्हा दाखल -
अपघातानंतर चालक स्वतःहून गाडीबाहेर आला, तर अग्निशमन दलाच्या पथकाने ढिगाऱ्यात अडकलेल्या प्रवाशाला बाहेर काढले. दोघांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. पोलिसांनी ३३ वर्षीय चालक जॅकब हँकिन्स विरोधात निष्काळजीपणाने गाडी चालवणे आणि इतरांचा जीव धोक्यात टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अपघातासंदर्भात अधिक तपास करत आहेत.

Web Title : ट्रक 30 मीटर तक उड़ा, घर में घुसा; परिवार सुरक्षित!

Web Summary : टिगार्ड, ओरेगन में एक तेज रफ्तार ट्रक हवा में उड़कर एक घर में जा घुसा। घर के अंदर मौजूद परिवार चमत्कारिक ढंग से बच गया क्योंकि ट्रक बाथरूम में उतरा। ड्राइवर पर लापरवाही से गाड़ी चलाने का आरोप है।

Web Title : Truck Flies 30 Meters, Crashes into House; Family Survives!

Web Summary : A speeding truck in Tigard, Oregon, became airborne, crashing into a house. The family inside miraculously escaped injury as the truck landed in the bathroom. The driver faces charges of reckless driving.