तीन वर्षांच्या खोडसाळ मुलाने चक्क 'चार लाख' रंगात घातले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 10:08 IST2018-10-22T10:07:55+5:302018-10-22T10:08:21+5:30

लहानपणी केलेला खोडकरपणा आठवल्यानंतर खुप मज्जा येते. मात्र, हाच खोडकरपणा नुकसानीचा ठरला असेल तर आई वडिलांचा 'प्रसाद' ही खाल्ला ...

Three year old boy throws a 'four lakh' interior in color ... | तीन वर्षांच्या खोडसाळ मुलाने चक्क 'चार लाख' रंगात घातले...

तीन वर्षांच्या खोडसाळ मुलाने चक्क 'चार लाख' रंगात घातले...

लहानपणी केलेला खोडकरपणा आठवल्यानंतर खुप मज्जा येते. मात्र, हाच खोडकरपणा नुकसानीचा ठरला असेल तर आई वडिलांचा 'प्रसाद' ही खाल्ला असेलच. असाच काहीसा प्रकार युरोपमध्ये घडला आहे. एका 3 वर्षाच्या मुलाने नुकतेच 4 लाख रुपये खर्च करून केलेले इंचेरिअर अवघ्या 5 मिनिटात खराब केल्याने त्याचे पालक हतबल झाले आहेत. 


ओली नेल्सन या तीन वर्षांच्या मुलाला त्याच्या पालकांनी पाच मिनिटांसाठी ठेवून बाहेर गेले होते. मात्र, घरी येऊन पाहतात तर ओली महाशय भिंती रंगविण्याच्या रंगात डुंबत होते. ओलीने केवळ पाच मिनिटांत रंगाचा बॉक्स घरात ओतला होता. तसेच स्प्रे पेंटने लिव्हिंग रुमच्या भिंतीही रंगविल्या होत्या. महाशय एवढ्यावरच थांबले नाहीत तर घरातील पूर्ण कार्पेटवर त्याच्या पावलांनी ठसे उमटविलेले होते.

 
ओलीच्या या खोडसाळपणामुळे त्याच्या वडीलांनी नुकतेच 4 हजार युरो म्हणजेच 3.8 लाख रुपये खर्च करून नवीन केलेले इंटेरिअरचे नुकसान झाले. ओलीच्या या कृत्याने नेल्सन दांपत्याला हसावे की रडावे हेच सुचत नव्हते. 


 

Web Title: Three year old boy throws a 'four lakh' interior in color ...