चार तरुणांनी 'असे' हॅक केले होते, ओबामा अन् बिल गेट्ससह तब्बल 130 दिग्गजांचे ट्विटर अकाउंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 13:46 IST2020-07-19T13:37:13+5:302020-07-19T13:46:33+5:30
यांपैकी किर्ककडेच ट्विटरचे अत्यंत महत्वाचे टूल होते. या टूलच्या माध्यमाने कुठल्याही ट्विटर अकाउंटला हॅन्डल केले जाऊ शकत होते. त्याने हे टूल दोन जणांसोबत शेअर केले.

चार तरुणांनी 'असे' हॅक केले होते, ओबामा अन् बिल गेट्ससह तब्बल 130 दिग्गजांचे ट्विटर अकाउंट
नुकतेच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, टेस्लाचे सीईओ एलन मस्क, अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस आणि माइक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्यासह तब्बल 130 दिग्गजांचे ट्विटर अकाउंट हॅक झाले होते. हे अकाउंट हॅक करणाऱ्यांचा खुलासा झाला आहे. चार तरुण हॅकर्सनी खेळता-खेळता हे अकाउंट हॅक केले होते. माध्यमांतून आलेल्या वृत्तांनुसार, या हॅकिंगमध्ये कुण्या बड्या सायबर गुन्हेगारांचा हात नव्हता. तर हे चारही हॅकर्स ऑनलाइन हॅन्डल्सची खरेदी-विक्री करणाऱ्या ऑनलाइन कम्युनिटी प्लॅटफॉर्म ‘ओजीयूझर्सडॉटकॉम’वर भेटले होते.
माध्यमांत आलेल्या वृत्तांनुसार, ‘ओजीयूझर्सडॉटकॉम’वरच हॅकर्सना ट्विटरचे अत्यंत महत्वाचे टूल मिळाले होते. याच्याच सहय्याने या तरुणांनी दिग्गज मंडळींचे अकाउंट हॅक केले. सांगण्यात येते, की तीन हॅकर्सच्या ऑनलाइन मोनिकर म्हणजे ऑनलाइन ठेवण्यात येणाऱ्या खोट्या नावांचीही माहिती मिळाली आहे. वृत्तांमध्ये सांगण्यात आले आहे, की या तिन्ही हॅकर्सची ऑनलाइन नावे, एलओएल, एव्हर सो एनक्सस आणि किर्क, अशी आहेत.
यांपैकी किर्ककडेच ट्विटरचे अत्यंत महत्वाचे टूल होते. या टूलच्या माध्यमाने कुठल्याही ट्विटर अकाउंटला हॅन्डल केले जाऊ शकत होते. त्याने हे टूल दोन जणांसोबत शेअर केले. यानंतर या तरुणांनी आणखी एका सहकाऱ्याच्या सोबतीने दिग्गज मंडळींचे ट्विटर अकाउंट हॅक केले.
कर्मचाऱ्यांच्या साथीने हॅकर्सनी हॅक केले होते अकाउंट - ट्विटर
दिग्गजांचे अकाउंट हॅक झाल्याच्या घटनेवर स्पष्टिनकर देताना शनिवारी ट्विटरने म्हटले आहे, की हॅकर्सनी सोशल इंजिनिअरिंग स्किमच्या माध्यमाने काही कर्मचाऱ्यांना टार्गेट केले. त्यांनी ट्विटरच्या अंतर्गत प्रणालीपर्यंत पोहोचण्यासाठी काही कर्मचाऱ्यांना जाळ्यात अडकवले आणि टू फॅक्टर प्रोटेक्शनच्या माध्यमाने इंटरनल सिस्टमपर्यंत पोहोचले.
यावर, भारताची सायबर संरक्षण संस्था सीईआरटी-इनने हॅकिंगसंदर्भात ट्विटरला नोटिस जारी केली असून किती भारतीय यूझर्सचे अकाउंट हॅक झाले यासंदर्भात माहिती विचारली आहे.
लाखो यूजर्सना बसला कोट्यवधींचा फटका -
सायबर सिक्योरिटीच्या अल्पेरोविच यांनी सांगितले, की या हल्ल्यामुळे सर्वसामान्यांना मोठे नुकसान झाले आहे. या हॅकदरम्यान हॅकर्सने जवळपास 300 लोकांकडून तब्बल 1 लाख 10 हजार डॉलर बिटकॉईन उकळले आहेत.
डिजिटल हल्ला -
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, अॅमेझॉन प्रमुख जेफ बेजोस, डेमोक्रेटिक पार्टीचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बिडेन आणि मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स यांच्यासंह अनेक दिग्गजांचे ट्विटर अकाउंट एकाच वेळी हॅक करण्यात आले. तसेच, प्रत्येकाच्या अकाउंटवरून एकच ट्विट करण्यात आले, आपण बिटकॉईनच्या माध्यमाने पैसे पाठवा आणि आम्ही आपल्याला दुप्पट पैसे देऊ.
महत्त्वाच्या बातम्या -
बुरखा फाटला!, सरकार PLA सोबत संबंध असणाऱ्या कंपन्यांविरोधात अॅक्शन घेण्याच्या तयारीत
Amazonवर पुन्हा 'Apple'चा सेल, iPhone 11 सह 'या' प्रोडक्ट्सवर मिळणार मोठा डिस्काउंट
CoronaVirus : खूशखबर! जगातली पहिली कोरोना लस ऑगस्टमध्ये येणार, 'हा' देश 3 कोटी डोस बनवणार
रशियाचं नवं 'ब्रह्मास्त्र' S-500, आकाशात उपग्रहांचाही करेल खात्मा
गुडन्यूज! : अमेरिकेची लस अखेरच्या टप्प्यात; निकालानंतर वैज्ञानिकही आनंदात
"चीनकडून लाच घेतायत नेपाळचे पंतप्रधान ओली, स्विस बँकेच्या खात्यात ठेवले आहेत कोटीच्या कोटी"
...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप
खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा