चीनचा नेमका इरादा काय? गेल्या ९ महिन्यांत तिसऱ्यांदा सैन्याचा 'टॉप कमांडर' बदलला, भारताच्या भुवया उंचावल्या! 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 01:18 PM2021-09-08T13:18:46+5:302021-09-08T13:19:20+5:30

भारत-चीनमधील वादग्रस्त सीमेची जबाबदारी हाताळणारा चीनचा टॉप कमांडर चीननं पुन्हा एकदा बदलला आहे.

For third time in 9 months China changes top commander overseeing disputed border | चीनचा नेमका इरादा काय? गेल्या ९ महिन्यांत तिसऱ्यांदा सैन्याचा 'टॉप कमांडर' बदलला, भारताच्या भुवया उंचावल्या! 

चीनचा नेमका इरादा काय? गेल्या ९ महिन्यांत तिसऱ्यांदा सैन्याचा 'टॉप कमांडर' बदलला, भारताच्या भुवया उंचावल्या! 

Next

भारत-चीनमधील वादग्रस्त सीमेची जबाबदारी हाताळणारा चीनचा टॉप कमांडर चीननं पुन्हा एकदा बदलला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासून लडाखमध्ये भारत-चीनचे सैनिक वारंवार एकमेकांसमोर उभे ठाकण्याच्या घटना वाढल्या आङेत. त्यातच गेल्या ९ महिन्यांत चीनकडून तिसऱ्यांदा टॉप कमांडर बदलण्यात आला आहे. चीनकडून सुरू असलेल्या या हालचालींमुळे भारतीय संरक्षण विभागाच्या भुवया उंचावल्या आहेत. (For third time in 9 months, China changes top commander overseeing disputed border)

चीनचे राष्ट्रपती क्षी जिनपिंग यांनी जनरल वांग हायजियांग हे वेस्टर्न थिएटर कमांडचे प्रमुख असतील अशी घोषणा केली आहे. वेस्टर्न थिएटर कमांडचं प्रमुखपद हे चीनच्या सैन्यातील महत्त्वाचं पद आहे. कारण या अधिकाऱ्यावर चीनच्या सर्वाधिक ३,४८८ किमी लांबीच्या सीमेच्या संरक्षणाची जबाबादारी असते. हा संपूर्ण परिसर लडाख ते अरुणाचल प्रदेश इथवर पसरलेला आहे. 

चीनने अडवला भारताचा समुद्री मार्ग, जाणून घ्या वाद काय ?

५८ वर्षीय जनरल वांग हे चीनी सैन्यातील अनुभवी लष्करी अधिकारी आहेत. तिबेट शिनजियांग पथकात त्यांनी प्रमुखपदाची जबाबदारी पाहिली आहे. त्यांची आता जनरल झू किलिंग यांच्या जागेवर नियुक्ती करण्यात आली आहे. झू किलिंग यांची जुलै महिन्यातच वेस्टर्न थिएटर कमांडचं प्रमुखपदी नियुक्ती झाली होती. त्यांच्याआधी गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात जनरल झांग झुडोंग हे वेस्टर्न कमांडचे कमांडर होते. सेवा निवृत्तीनंतर त्यांच्या जागी झू किलिंग यांची वर्णी लागली होती. 

तालिबानचं सहा 'मित्र' देशांना सरकार स्थापनेच्या सोहळ्यासाठी निमंत्रण; अमेरिकेचे सर्व 'शत्रू' जमणार!

"चीनकडून केले गेलेल बदल सर्वसामान्य दिसत नाहीत. विशेषत: वेस्टर्न कमांडचं प्रमुख पदाच्या बाबतीत चीनकडून वारंवार बदल केला गेला आहे. त्यामुळे चीनकडून केल्या जाणाऱ्या बदलांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत", असं एका वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यानं सांगितलं. 

अफगाणिस्तानच्या भूमीखाली दडले २०० लाख कोटींचे खनिज; चीनचा डोळा, दिला पाठिंबा

चीनी सैन्यातील रणनिती आणि इतर गोष्टी गुप्त राहाव्यात यासाठी वारंवार सैन्याच्या नेतृत्त्वात बदल करण्याची भूमिका चीननं ठेवली आहे, असं सांगितलं जात आहे. सध्याच्या वेस्टर्न कमांडच्या कमांडरचं तर अवघ्या दोनच महिन्यात पद काढून घेण्यात आलं आहे. यामागे तीन कारणं असू शकतात अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे. यात अधिकाऱ्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप, दुसरं कारण म्हणजे अपेक्षित कामगिरीत फोल ठरणं आणि तिसरं कारण म्हणजे सेंट्रल मिलिट्री कमिशननं जारी केलेल्या सूचनांचं योग्य पद्धतीनं पालन न केल्यानं पसरलेली नाराजी अशी कारणं असू शकतात. 

Web Title: For third time in 9 months China changes top commander overseeing disputed border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.