समुद्रातील किंग कोण? ते १४ देश...ज्यांच्याकडे उद्ध्वस्त करण्याची क्षमता; यादीत भारत कितवा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 12:11 IST2026-02-16T12:10:18+5:302026-02-16T12:11:29+5:30

जगात किती देशांकडे एअरक्राफ्ट कॅरियर आहे आणि अमेरिकेच्या तुलनेत ते किती आहेत हे जाणून घेणेही गरजेचे आहे.

These 14 Countries with Aircraft Carriers in 2026, 11 nuclear-powered aircraft carriers in America | समुद्रातील किंग कोण? ते १४ देश...ज्यांच्याकडे उद्ध्वस्त करण्याची क्षमता; यादीत भारत कितवा?

समुद्रातील किंग कोण? ते १४ देश...ज्यांच्याकडे उद्ध्वस्त करण्याची क्षमता; यादीत भारत कितवा?

संरक्षण क्षेत्रात अमेरिका आपला दबदबा राखण्याचा सातत्याने प्रयत्न करत असते. केवळ हवेतच नाही तर जेव्हा गोष्ट नौदलाची येते तेव्हाही जगात अमेरिका सर्वात जास्त ताकदवान देश म्हणून पुढे असतो. अलीकडेच अमेरिकेने त्यांचे सर्वाधिक मजबूत एअरक्राफ्ट कॅरियर USS अब्राहम लिंकन अरबी समुद्रात तैनात केले आहे. त्यातच जगातील सर्वात मोठी आणि सर्वात प्रगत विमानवाहू युद्धनौका मानली जाणारी दुसरी USS गेराल्ड आर. फोर्ड (सीव्हीएन-७८) मध्य पूर्वेत पाठवण्याची तयारी सुरू आहे.

अमेरिकेची गोष्ट निघालीच आहे तर जगात किती देशांकडे एअरक्राफ्ट कॅरियर आहे आणि अमेरिकेच्या तुलनेत ते किती आहेत हे जाणून घेणेही गरजेचे आहे. एअरक्राफ्ट कॅरियर देशांना समुद्रात ताकद देण्याचं काम करतात. ज्यात हजारो क्रू मेंबर्स, अनेक लढाऊ विमाने आणि सपोर्ट एअरक्राफ्टने दिली जातात. ही जहाजे केवळ युद्धातच नव्हे तर पॉवर प्रोजेक्शन, सी. कंट्रोल, डिटरेंस आणि मानवी सहाय्यता करण्यातही महत्त्वाची भूमिका निभावतात. २०२६ मध्ये एकूण १४ देशांकडे एअरक्राफ्ट कॅरियर आहेत ज्यात काही परंपरागत विमानवाहू नौका आहेत. 

यात काही प्रमाणात न्यूक्लियर पॉवर्ड, काही शॉर्ट टेकऑफ बट अरेस्टेड रिकवरी, काही कॅटापल्ट असिस्टेड टेकऑफ बट अरेस्टेड रिकवरी आणि काही लँडिंग हेलिकॉप्टर डॉक जे हेलिकॉप्टर अथवा शॉर्ट टेकऑफ व्हर्टिकल लँडिंग एअरक्राफ्ट आहेत. अमेरिकन नौदलाच्या कॅरियर एविएशन कॅपेबिलिटीसोबत कुणी तुलना करू शकत नाही. निमित्झ-क्लास आणि फोर्ड-क्लास अणुऊर्जेवर चालणारी सुपरकॅरियर्स, वास्प, तारावा आणि अमेरिका-क्लास एम्फिबियस असॉल्ट जहाजे आणि इतर जहाजांसह अमेरिकेला F/A-18E/F, EA-18G, E-2D, F-35B आणि F-35C सारखी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर लाँच करण्यास सक्षम करतात. अमेरिकेकडे सर्वात आधुनिक कॅरियर जहाजे आहेत. जी हजारो किमी ऑपरेट करू शकतात. अमेरिकेकडे एकूण डेक स्पेस इतरांच्या तुलनेत दुप्पट आहे ज्यामुळे समुद्रातील बादशाह अमेरिका आहे. अमेरिकेकडे ११ कॅरियर्स आहेत. 

चीन - पीपुल्स लिबरेशन आर्मी नौदलाकडे सध्या ३ एअरक्राफ्ट कॅरियर्स आहेत. चीनने अलीकडेच फुजियान कॅरियरचं आधुनिक व्हर्जन चाचणी केली. ज्यात मॅग्नेटिक लॉन्चिंग सिस्टम आहे. चीन वेगाने त्यांच्या कॅरियर जहाजात वाढ करत आहे. ही जहाजे १५ फायटर जेट, हेलिकॉप्टर आणि इतर एअरक्राफ्ट घेऊन जाऊ शकतात. 

यूनाइटेड किंगडम - यूके क्वीन एलिजाबेथ क्लास कॅरियर ऑपरेट करते, ज्यात २ जहाजे आहेत. दोन्हीही एफ ३५ लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर घेऊन जाऊ शकतात. ही जहाजे नाटो ऑपरेशन्समध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात. 

भारत - भारताकडे INS विक्रमादित्य आणि विक्रांत कॅरियर आहेत. ज्यातून भारत हिंद महासागरात संरक्षण करण्याचं काम करते. INS विक्रमादित्य हे भारताने रशियाकडून खरेदी केले आहे. तर आयएनएस विक्रांत हे भारताचे पहिले स्वदेशी कॅरियर आहेत जे कोची शिपयार्डात बनवण्यात आले. भविष्यात भारत आणखी कॅरियर वाढवण्यावर भर देत आहे. दरम्यान, इटली, जपान, साऊथ कोरिया, स्पेन, थायलँड, तुर्की, रशिया, फ्रान्स, इजिप्त, ऑस्ट्रेलिया यांच्याकडे प्रत्येकी १ कॅरियर्स आहेत. 

Web Title : वैश्विक विमान वाहक शक्ति: किन देशों का समुद्रों पर वर्चस्व?

Web Summary : अमेरिका विमान वाहक शक्ति में सबसे आगे है, जिसके बाद चीन और यूके हैं। भारत हिंद महासागर को सुरक्षित करते हुए आईएनएस विक्रमादित्य और विक्रांत का संचालन करता है। चौदह देशों के पास विमान वाहक पोत हैं, जो शक्ति का प्रदर्शन करते हैं और मानवीय सहायता प्रदान करते हैं।

Web Title : Global Aircraft Carrier Power: Which Countries Dominate the Seas?

Web Summary : The US leads in aircraft carrier strength, followed by China and the UK. India operates INS Vikramaditya and Vikrant, securing the Indian Ocean. Fourteen nations possess aircraft carriers, projecting power and providing humanitarian aid.