ग्रीनलँडवर कब्जा मिळवल्याशिवाय माघारीचा प्रश्नच येत नाही! डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान; अमेरिका-युरोपमध्ये युद्ध भडकणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 12:39 IST2026-01-21T12:38:06+5:302026-01-21T12:39:52+5:30
दरम्यान, ग्रीनलँडचे पंतप्रधान जेन्स-फ्रेडरिक नीलसन यांनी अमेरिकेच्या हल्ल्याची शक्यता 'वास्तविक' असल्याचे म्हणत, आपल्या नागरिकांना अन्नधान्य साठवण्यासंदर्भात सूचना जारी केली आहे...

ग्रीनलँडवर कब्जा मिळवल्याशिवाय माघारीचा प्रश्नच येत नाही! डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान; अमेरिका-युरोपमध्ये युद्ध भडकणार?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ग्रीनलँडच्या बाबतीत अधिकच आक्रमक दिसत आहेत. कुठल्याही परिस्थितीत ग्रीन लँड घ्याचाच, असा निर्धारच जणू त्यांनी केला आहे. "आता मागे हटण्याचा प्रश्नच येत नाही, ग्रीनलँड अत्यंत आवश्यक आहे", असी पोस्ट त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर केली आहे. दरम्यान, "ग्रीनलँड मिळवण्यासाठी आपण कोणत्या थराला जाल?" असा प्रश्न त्यांना एका पत्रकाराने व्हाईट हाऊसमध्ये केला. यावर, "तुम्हाला लवकरच समजेल," असे सूचक उत्तर त्यांनी दिले. यामुळे अममेरिका ग्रीनलँडवर केव्हाही हल्ला करू शकते, असी शक्यता वर्तवली जात आहे.
"आता जग कसलीही नियमावली नसलेल्या दिशेने वळत आहे" -
दरम्यान, ग्रीनलँडचे पंतप्रधान जेन्स-फ्रेडरिक नीलसन यांनी अमेरिकेच्या हल्ल्याची शक्यता 'वास्तविक' असल्याचे म्हणत, आपल्या नागरिकांना अन्नधान्य साठवण्यासंदर्भात सूचना जारी केली आहे. याशिवाय, "आता जग कसलीही नियमावली नसलेल्या दिशेने वळत आहे", असा इशारा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन दिला आहे.
यातच, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनीही अमेरिकन हल्ल्याच्या स्थितीत ग्रीनलँडला पाठिंबा जाहीर केला आहे. एवढेच नाही तर, "जुनी व्यवस्था आता परत येणार नाही," असे विधानही त्यांनी केले आहे.
'या' प्रश्नावर ट्रम्प म्हणाले, "नो कमेंट्स" -
ग्रीनलँडसाठी 'नाटो' (NATO)मध्ये फूट पडेल का? असा प्रश्न विचारला असता, ट्रम्प म्हणाले, "नाटोसाठी माझ्यापेक्षा जास्त कोणीही केलेले नाही, आम्हाला जगाच्या रक्षणासाठी याची आवश्यकता आहे. याच वेळी त्यांनी एक नवा प्रश्नही उपस्थित केला की, "आवश्यकता भासल्यास, नाटो अमेरिकेच्या मदतीला एईल का? मला माहीत आहे, आम्ही मदतीला जाऊ, मात्र संकटकाळी नाटो देश अमेरिकेच्या मदतीला येतील का, याबाबत मला शंका वाटते." याचवेळी, ग्रीनलँडवर ताबा मिळवण्यासाठी लष्करी बळाचा वापर करणार का? या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले, "नो कमेंट्स".