Rushi Sunak reaction on Operation Sindoor: मंगळवारची सकाळ ही भारतीयांसाठी खूपच आनंददायी ठरली. पहलगाम हल्ल्याच्या भारताने पाकिस्तानच्या भूमीत घुसून बदला घेतला. काश्मीरच्या पहलगाममध्ये काही दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला ( Pahalgam Terror Attack ) झाला. त्यात २६ निष्पाप हिंदूंची हत्या करण्यात आली. याचा बदला म्हणून मंगळवारी रात्री दीडच्या भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या मार्फत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. तिन्ही सैन्यदलांनी मिळून संयुक्तपण केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानच्या ४ आणि पीओकेमधी ५ दहशतवादी तळांना एकाचवेळी टार्गेट करण्यात आले. या हल्ल्याची अधिकृत माहिती भारत सरकारच्या सैन्यदलाने दिली. या एअरस्ट्राईकनंतर इंग्लंडचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
इंग्लंडचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूर वरून अतिशय रोखठोक मांडले. जगाच्या पाठीवर कुठल्याही देशाला दुसऱ्या देशाच्या मदतीने झालेला दहशतवादी हल्ला स्वीकारावा लागू नये असे सुनक म्हणाले. तसेच, भारताने केलेली कारवाई योग्यच असून अशा कारवाईचा भारताला पूर्ण अधिकार असल्याचा पुनरूच्चार त्यांनीही केला. याशिवाय, दहशतवाद हा कायम शासनास पात्र ठरतो. दहशतवाद्यांचा नायनाट केला जायलाच हवा असेही सुनक म्हणाले. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले, "कोणत्याही देशाला त्यांच्याच भूमीवर दुसऱ्या देशाकडून पुरस्कृत केलेले दहशतवादी हल्ले सहन करावे लागू नयेत. दहशतवादी ज्या ठिकाणी लपले आहेत, त्या ठिकाणी कारवाई करण्याचा भारताला अधिकार आहे. दहशतवादाचे कंबरडे मोडण्यासाठी भारताने केलेल्या एअरस्ट्राईकचे मी समर्थनच करेन. दहशतवाद्यांना शिक्षा होणारच. त्यांना असेच सोडून देता येणार नाही."
दरम्यान, भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सकाळपासूनच बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे. पाकिस्तानमध्ये उच्चस्तरीय सुरक्षा बैठक आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची (NSC) बैठक झाली. यामध्ये कॅबिनेट मंत्री, सर्व प्रांतांचे मुख्यमंत्री, सर्व लष्कर प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.