नवी दिल्ली - दक्षिण सुदानमध्ये भारताच्या शांतता सैनिकांनी ज्याप्रकारे महत्त्वाचा कॉरिडॉर खुला करण्यास मदत केली आहे हे पाहून संयुक्त राष्ट्रानेही दिलखुलास कौतुक केले आहे. संयुक्त राष्ट्राने संकटग्रस्त दक्षिण सुदानच्या लोकांची मदत करणाऱ्या भारताच्या शांतता सैनिकांच्या भूमिकेवर भाष्य केले आहे. जो मार्ग मागील दीड वर्षापासून पुरामुळे बंद होता तो आता भारतीय सैनिकांनी खुला केला आहे. ज्यामुळे या भागात मानवी मदत पोहचण्याचा अडथळा दूर झाल्याचं संयुक्त राष्ट्राने सांगितले आहे.
दक्षिण सुदानला अडचणींवर मात करण्यास मदत
संयुक्त राष्ट्र दक्षिण सुदान मिशनने (UNMISS) गुरुवारी त्यांच्या एक्स हँडलवर काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते, स्टेफान डुजारिक म्हणाले की, कठीण काळातही दक्षिण सुदानमध्ये काही आशादायक गोष्टी घडल्या आहेत. भारतीय शांतता सैनिकांनी गेल्या वर्षीच्या पुरामुळे बंद करण्यात आलेला न्यू पॅलोइचमार्गे जाणारा महत्त्वाचा मालकल-रँक मुख्य पुरवठा मार्ग पुन्हा सुरू केला आहे. या नवीन रस्त्यामुळे गरजू स्थानिक लोकांपर्यंत मानवतावादी मदत पोहोचवणे सोपे झाले आहे. त्यामुळे हा परिसर प्रवासासाठी अधिक सुरक्षित झाला आहे आणि पूर्वी पुरामुळे उद्ध्वस्त झालेली जमीनही पुन्हा वापरात आली आहे असं त्यांनी सांगितले.
दक्षिण सुदानमध्ये भारत हा संयुक्त राष्ट्रांचा सर्वात मोठा सहकारी आहे. जानेवारी २०२६ पर्यंत दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत भारत हा सर्वात मोठा भागीदार राहिला आहे. या शांतता मोहिमेत भारताचे १,७७९ शांतता सैनिक कार्यरत आहेत. दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्रांची शांतता मोहीम नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि मानवतावादी मदत पुरवण्याचे काम करत आहे. तिथल्या चालू असलेल्या शांतता प्रक्रियेतही ही मोहीम महत्त्वाची भूमिका बजावते.
दक्षिण सुदानमध्ये पुरामुळे संकट
दरम्यान, गेल्या वर्षी दक्षिण सुदानमधील पुरामुळे आठही राज्यांमध्ये १३.५ लाख लोकांना फटका बसला. संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयाच्या अंदाजानुसार पुरामुळे सुमारे ३७५,६०० लोक विस्थापित झाले होते.
Web Summary : UN praises Indian peacekeepers in South Sudan for reopening a vital supply route blocked by floods for 1.5 years. This allows humanitarian aid to reach those in need, improving safety and enabling land reclamation. India is a major contributor to the UN mission.
Web Summary : संयुक्त राष्ट्र ने दक्षिण सूडान में बाढ़ से बंद महत्वपूर्ण आपूर्ति मार्ग को फिर से खोलने के लिए भारतीय शांति सैनिकों की सराहना की। इससे जरूरतमंदों तक मानवीय सहायता पहुंचेगी, सुरक्षा में सुधार होगा और भूमि का पुन: दावा किया जा सकेगा। भारत संयुक्त राष्ट्र मिशन का एक प्रमुख योगदानकर्ता है।