युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 08:30 IST2025-08-19T08:29:30+5:302025-08-19T08:30:01+5:30

"झेलेन्स्की यांच्यासोबत आपली चांगली चर्चा झाली आहे. युक्रेनला सर्व युरोपीय देश सिक्योरिटी गॅरंटी देतील," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

The war will stop I am very happy, I called the President of Russia After the meeting with Zelensky, what did donal Trump say | युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 

युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध लवकरच थांबण्याची शक्यता आहे. यो दोन्ही देशांत लवकरच शांतता करार होऊ शकतो. यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे संकेत दिले आहेत. त्यांनी सोमवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत चर्चा केली. याशिवाय ट्रम्प यांनी काही युरोपीय देशांच्या प्रमुखांनाही भेटले. यानंतर ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथच्या माध्यमाने महत्वाची माहिती दिली. "झेलेन्स्की यांच्यासोबत आपली चांगली चर्चा झाली आहे. युक्रेनला सर्व युरोपीय देश सिक्योरिटी गॅरंटी देतील," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

ट्रूथ पोस्ट करत ट्रम्प म्हणाले, "व्हाइट हाउसमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झँडर स्टब, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, युनायटेड किंगडमचे पंतप्रधान कीर स्टारमर, जर्मनीचे चांसलर फ्रेडरिक मर्झ, युरोपीयन आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन आणि नाटोचे महासचिव मार्क रूट यांच्यासोबत चांगली चर्चा झाली."

रशिया-युक्रेन शांतता करारावर काय म्हणाले ट्रम्प? -
रशिया आणि युक्रेन यांच्यात लवकरच शांतता करार होऊ शकतो, असे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. ते म्हणाले, "अमेरिकेसह अनेर युरोपीय देश, युक्रेनला सुरक्षेची हमी देतील. यासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली. रशिया आणि युक्रेन यांच्यातील शांततेच्या शक्यतेने सर्वच जण अत्यंत आनंदात आहेत. बैठक संपल्यानंतर मी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना फोन केला होता आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात एका निर्धारित ठिकानी बैठकीच्या व्यवस्थेला सुरुवात केली."

ट्रम्प पुन्हा एकदा पुतिन-झेलेन्स्की यांच्यासोबत बैठक करणार - 
ट्रम्प पुढे म्हणाले, "त्या बैठकीनंतर आम्ही पुन्हा एक बैठक करू. या बैठकीत पुतिन आणि झेलेन्स्की यांच्यासोबत मीही उपस्थित राहील. साधारणपणे गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी हे एक अत्यंत चांगले पाऊल आहे. उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स, परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो आणि विशेष दूत स्टीव विटकॉफ रशिया आणि युक्रेन यांच्यात कॉर्डिनेट करत आहेत. या प्रकरणात लक्ष देण्यासाठी धन्यवाद!"


 

Web Title: The war will stop I am very happy, I called the President of Russia After the meeting with Zelensky, what did donal Trump say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.