अमेरिकेने ज्यांच्यावर घातली होती बंदी, तेच बनले इराणचे सर्वोच्च नेता; कोण आहेत मोजतबा खामेनेई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 08:45 IST2026-03-09T08:43:33+5:302026-03-09T08:45:11+5:30

Iran's New Supreme Leader: अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मुलगा मोजतबा खामेनेई यांची इराणचे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. ५६ वर्षीय मोजतबा खामेनेई यांच्या निवडीने इराणमध्ये कट्टरपंथीय सरकार कायम असल्याचेच निश्चित झाले आहे.  

The one who was banned by America became the Supreme Leader of Iran; Who is Mojtaba Khamenei? | अमेरिकेने ज्यांच्यावर घातली होती बंदी, तेच बनले इराणचे सर्वोच्च नेता; कोण आहेत मोजतबा खामेनेई?

अमेरिकेने ज्यांच्यावर घातली होती बंदी, तेच बनले इराणचे सर्वोच्च नेता; कोण आहेत मोजतबा खामेनेई?

New Supreme Leader Mojtaba Khamenei: अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर मोजतबा खामेनेई यांची इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवड करण्यात आली आहे. अयातुल्लाह अली खामेनेई यांची इस्रायल-अमेरिकेने हवाई हल्ला करत हत्या केली. त्यानंतर सर्वोच्च नेते पद रिक्त होते. मोजतबा खामेनेई यांच्या निवडीने इराणमध्ये कडवी धार्मिक विचारधारा पूर्णपणे मजबूत असल्याचेच संकेत मिळत आहेत. 

इराणी माध्यमांच्या रिपोर्ट्नुसार, धार्मिक परिषदेने ५६ वर्षीय मौलवी असलेले मोजतबा खामेनेई यांची इराणचे सर्वोच्च नेते म्हणून निवड केली. मोजतबा खामेनेई हे इस्रायल-अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात वाचले होते. अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूला एक आठवडा झाल्यानंतर ही निवड करण्यात आली आहे. 

मोजतबा खामेनेईंची निवड का करण्यात आली?

इराणच्या सर्वोच्च नेते पदासाठी व्यक्तीची निवड करणाऱ्या परिषदेचे सदस्य, अयातुल्लाह मोहसेन हैदरी अलेकासिर यांनी सांगितले की, 'खामेनेई म्हणायचे की, इराण सर्वोच्च नेता असा असायला हवा की, ज्याचा शत्रू राष्ट्रे (इस्रायल, अमेरिका) द्वेष करतात. शत्रूंना राष्ट्रांना आवडत नाही असा नेता. इतकंच नाही, तर सर्वात मोठा राक्षसाने (अमेरिका) त्यांचे नाव घेतले आहे.'

पाश्चात्यांना विरोध, वडिलांचे 'गेटकीपर'

रॉयटर्स वृत्तसंस्थेने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, मोजतबा खामेनेई यांनी त्यांच्या वडिलांच्या (अयातुल्लाह अली खामेनेई) सत्ताकाळात संरक्षण दल आणि त्यांच्या नियंत्रणात असलेल्या व्यावसायिक साम्राज्यातील महत्त्वाचा व्यक्ती म्हणून त्यांनी ओळख मिळवली. 

त्यांनी अशा सुधारणावाद्यांना विरोध केला, जे पाश्चात्य (अमेरिका) देशांशी संबंध ठेवण्याचे प्रयत्न करतात. कारण पाश्चात्य राष्ट्रांचा इराणच्या अणुऊर्जा कार्यक्रमांना विरोध आहे आणि त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात. 

मोजतबा खामेनेई यांना त्यांच्या वडिलांचे गेटकीपर म्हणून ओळखले जात होते. अयातुल्लाह अली खामेनेई यांना भेटण्यासाठी मोजतबा यांच्या भेटीनंतरच जाता येत होते. त्याचबरोबर त्यांना कोण भेटतंय, याची माहिती त्यांना असायची. इराणच्या आयआरजीसी लष्करासोबत मोजतबा खामेनेई यांचे घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत.  

मशहद शहरात जन्म, इराक युद्धात महत्त्वाची भूमिका

मोजतबा खामेनेई यांचा जन्म १९६९ मध्ये झाला होता. शिया पंथामध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या मशहद शहरात त्यांचा जन्म झाला. अयातुल्लाह अली खामेनेई हे शाह यांच्याविरोधातील आंदोलनात असतानाच त्यांचा जन्म झाला होता. तरुण वयात असताना मोजतबा खामेनेई हे इराण-इराक युद्धात होते. त्यांनी इराणच्या लष्करातून सेवा केली. 

अमेरिकेने घातली होती बंदी

अमेरिकेच्या अर्थ विभागाने २०१९ मध्ये मोजतबा खामेनेई यांच्यावर बंदी घातली होती. मोजतबा खामेनेई यांची कोणत्याही पदावर नियुक्ती नाहीये. तो कोणत्या सरकारी पदावरही नाहीये, तरीही ते अयातुल्लाह अली खामेनेई यांचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. त्याचबरोबर सरकारच्या निर्णयांवरही प्रभाव टाकतात, असे सांगत अमेरिकेने त्यांच्यावर बंदी घातली होती. 

Web Title : मोजतबा खामेनेई: कभी अमेरिका ने लगाया प्रतिबंध, अब ईरान के सर्वोच्च नेता।

Web Summary : अयातुल्ला अली खामेनेई की मृत्यु के बाद, 2019 में अमेरिका द्वारा प्रतिबंधित मोजतबा खामेनेई को ईरान का सर्वोच्च नेता नियुक्त किया गया है। खामेनेई की मृत्यु के बाद धार्मिक परिषद ने 56 वर्षीय मौलवी को चुना। उन्होंने पश्चिमी संबंधों का विरोध किया और अपने पिता के द्वारपाल थे।

Web Title : Mojtaba Khamenei: Once sanctioned by US, now Iran's Supreme Leader.

Web Summary : Following Ayatollah Ali Khamenei's death, Mojtaba Khamenei, sanctioned by the US in 2019, has been appointed Iran's Supreme Leader. A religious council selected the 56-year-old cleric after Khamenei's death. He opposed Western ties and was his father's gatekeeper.