शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
3
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
4
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
5
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
6
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
7
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
8
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
9
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
10
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
11
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
12
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
13
संपादकीय: या कॅन्सरला ‘नीट’ रोखा, तीन दशकांत अक्षरशः खोबरे झाले
14
भारत-पाकमधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कुणाचे? 
15
राजनैतिक थकव्याने एकाकी इराणला भारताचा(च) आधार!
16
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
17
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
18
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
19
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
20
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात वाढली गाढवांची संख्या, चीन करतंय खरेदी! पुरुषांच्या लैंगिक आरोग्याशी आहे कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 14:47 IST

पाकिस्तानमध्ये सध्या गाढवांची संख्या वाढत असून, चीन पाककडून त्यांची गाढवं खरेदी करत आहे. यामागे चीनचं स्वतःच एक मोठं कारण आहे.

पाकिस्तानमध्ये यावर्षी गाढवांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या १०९०००ने वाढून ६०.८ लाखांहून अधिक झाली आहे. गेल्या वर्षी ही संख्या ५९ लाखांवर होती. तर, चीनमध्ये पाकिस्तानी गाढवांच्या कातडीची आणि मासांची मागणी सतत वाढत आहे. चीनमध्ये गाढवांच्या कातडीचा वापर करून पारंपरिक औषधे बनवली जातात. त्यामुळे चीन पाकिस्तानकडून गाढवांची खरेदी करत आहे. तर, पाकिस्तानने देखील गाढवांच्या उत्पादनात बरीच गुंतवणूक केली आहे.

पाकिस्तानने शिथिल केले कायदे! 

पाकिस्तानमध्ये गाढवांच्या संख्येत सलग तिसऱ्या वर्षी वाढ झाली आहे. चीनमधील पारंपरिक हर्बल औषधांमध्ये गाढवाचा वापर केला जातो. गाढवाच्या कातडीपासून बनवलेले इजियाओ नावाचे औषध त्वचा, रक्त, पुरूषांचे लैंगिक आरोग्य आणि प्रजनन आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. गाढवापासून बनणारे हे औषध अतिशय महागडे असून, श्रीमंत वर्गात अतिशय लोकप्रिय आहे. त्यामुळे चीनमध्ये गेल्या काही वर्षात गाढवांची संख्या कमी होताना दिसत आहे. म्हणूनच चीन पाकिस्तानकडून गाढवांची खरेदी करत आहे. पूर्वी पाकिस्तानमध्ये प्राण्यांच्या निर्यातीबाबत काही कठोर कायदे होते. परंतु, जेव्हा चीनमध्ये गाढवांची मागणी वेगाने वाढू लागली, तेव्हा काही नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली. यामुळे चीनला पाकिस्तानी गाढवे खरेदी करणे खूप सोपे झाले आहे.

चीनमध्ये वाढतेय  इजियाओची मागणी!

चीनमध्ये इजियाओच्या वाढत्या मागणीमुळे दरवर्षी लाखो गाढवे मारली जातात. इजियाओची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी चीनला दरवर्षी सुमारे ५९ लाख गाढवांची कत्तल करावी लागते. यासाठी चीनने स्वतःचे कत्तलखाने सुरू केले आहेत. गाढवांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी चीन पाकिस्तानवर सतत दबाव वाढवत आहे. चीनमध्ये जवळपास ३००० वर्षांपासून इजियाओचा वापर केला जात आहे. त्यामुळे चीनमध्ये याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानchinaचीनAnimalप्राणी