कैद्यावर महिला जेलरचा जडला जीव, प्रेमीयुगुल आरामात राहत होते बॅरेकमध्ये! खुलासा झाला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 21:30 IST2022-07-31T21:29:35+5:302022-07-31T21:30:45+5:30
Crime News : एम्माचा तुरुंगात असलेला प्रियकर मार्कस सोलोमन यालाही 13 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

कैद्यावर महिला जेलरचा जडला जीव, प्रेमीयुगुल आरामात राहत होते बॅरेकमध्ये! खुलासा झाला अन्...
एक महिला जेलर तिच्याच तुरुंगातील कैद्याच्या प्रेमात पडली. प्रेमात पडलेल्या एका महिला जेलरने कैद्यासाठी अनेक आयफोनची तस्करी केली. त्यांच्यात खूप बोलणं होत असे. तस्करीचा माल लपवता यावा म्हणून जेलर तिच्या प्रियकराला कारागृहात कधी चेकिंग होणार याची माहितीही देत असे. पण आता जेलर स्वतः तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
महिला जेलर एम्मा जॉन्सनला डर्बी क्राउन कोर्ट (यूके) न्या. जोनाथन बेनेट यांनी 15 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती, तर तिला तिच्या नोकरीवरूनही काढून टाकण्यात आले आहे. एम्माचा तुरुंगात असलेला प्रियकर मार्कस सोलोमन यालाही 13 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
न्यायाधीश आपल्या निर्णयात म्हणाले, 'तुम्ही कैद्याच्या प्रेमात पडला आहात हे मी मान्य करू शकतो, परंतु जेलर आपले काम अभिमानाने करतो. अशाप्रकारे विश्वासाचा गैरवापर होत असताना अशा लोकांनाही शिक्षा होणे गरजेचे आहे. संसदेने गुन्हा घोषित केला असतानाही कैदी मोबाईल वापरत असल्याचेही न्यायाधीशांनी सांगितले. मोबाईलची तस्करी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
तुरुंगात आयफोन विकले जात होते
कोर्टात उलटतपासणी सुरू असताना जेलर एम्मा जॉन्सन आणि कैदी मार्कस सोलोमन यांच्यात बरीच बातचीत झाल्याचेही समोर आले. मार्कस जेलमध्ये तस्करीचे फोन विकायचा. यातून मिळालेले पैसे जॉन्सनच्या खात्यात गेले. दोघांचे मेसेज कोर्टात सादर करण्यात आले होते, ज्यामध्ये हे स्पष्ट होते की, दोघेही वेगवेगळ्या प्रकारचे आयफोन खरेदी आणि विक्री करण्याबाबत बोलत होते.