इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 15:53 IST2026-04-08T15:45:19+5:302026-04-08T15:53:28+5:30

इराण-अमेरिका युद्धबंदीनंतर युएई आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानने मध्यस्थी करताना युएईला विश्वासात न घेतल्याने अमिरातीने आपली नाराजी जाहीर केली आहे.

The Iran-US ceasefire made the world happy, but 'this' country got angry! Allies are upset by 'that' move by Pakistan | इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज

इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज

इराण आणि अमेरिकेमध्ये दोन आठवड्यांच्या युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर संपूर्ण जग सुटकेचा नि:श्वास टाकत आहे. मात्र, मध्यपूर्वेतील शक्तिशाली देश असलेल्या संयुक्त अरब अमिरातीच्या गोटात मात्र संतापाची लाट आहे. विशेष म्हणजे, युएईची ही नाराजी अमेरिका किंवा इराणपेक्षा मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर जास्त आहे. पाकिस्तानने या संपूर्ण प्रक्रियेत युएईला विश्वासात न घेतल्याने मित्रराष्ट्रांमध्ये मोठी दरी निर्माण झाल्याचे चित्र आहे.

युएईच्या जखमेवर मीठ! पाकिस्तान का ठरला व्हिलन?

इराण आणि अमेरिका यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने मेसेंजरची भूमिका बजावली. मात्र, या प्रक्रियेत ज्या देशाचे सर्वाधिक नुकसान झाले, त्या युएईला बाजूला सारण्यात आले. 'फायनान्शिअल टाइम्स'च्या रिपोर्टनुसार, युद्धाच्या काळात इराणने युएईवर सर्वाधिक हल्ले केले. तब्बल २२०० ड्रोन, ५०० बॅलिस्टिक मिसाइल आणि २६ क्रूझ मिसाइल दुबई, शारजाह आणि अबू धाबीवर डागण्यात आले होते. इतका मोठा घाव सोसूनही तहाच्या चर्चेत युएईला स्थान न मिळाल्याने अमिराती संतापली आहे.

नाराजीची 'ही' आहेत ३ मुख्य कारणं:

- युएईचे तज्ज्ञ अमजद ताहा यांच्या मते, पाकिस्तानने केवळ अमेरिकेच्या इशाऱ्यावर ही युद्धबंदी घडवून आणली. या करारात इराणने पुन्हा हल्ला केल्यास त्याची जबाबदारी कोणाची? याबाबत स्पष्टता नाही. महत्त्वाचे म्हणजे, पाकिस्तानच्या अधिकृत संदेशात युएईच्या बलिदानाचा किंवा नुकसानीचा साधा उल्लेखही करण्यात आलेला नाही.

- मनारा संस्थेचे अध्यक्ष अली अल-नुएमी यांनी याला थेट विश्वासघात म्हटले आहे. त्यांच्या मते, युएईची उपेक्षा करण्यात आली असून, इतक्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय निर्णयापूर्वी अमिरातीशी साधी चर्चाही करण्यात आली नाही.

- होर्मुज सामुद्रधुनीवर झालेली डील ही युएईच्या हिताच्या विरोधात असल्याचे मानले जात आहे. पाकिस्तानने युएनमधील मतदानावेळी स्वतःला दूर ठेवले, मात्र डील करताना इराणच्या अटी मान्य केल्या. हा युएईसाठी मोठा राजनैतिक धक्का मानला जात आहे.

इराणला कमकुवत करण्याची संधी हुकली?

'वॉल स्ट्रीट जनरल'च्या अहवालानुसार, युएई या युद्धात इराणला पूर्णपणे खिळखिळे करण्याच्या तयारीत होते. युएईने इराणच्या नागरिकांवर बंदी घालून आणि अमेरिकेकडे लष्करी मदतीची मागणी करून इराणची सत्ता उलथवण्याचा प्रयत्न केला होता. होर्मुजवर नियंत्रण मिळवण्यासाठी बहरीनसोबत मिळून त्यांनी लष्करी दल बनवण्याचाही प्रस्ताव मांडला होता, मात्र पाकिस्तानच्या मध्यस्थीने या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरले गेले.

Web Title : ईरान-अमेरिका युद्धविराम से दुनिया खुश, पाकिस्तान से यूएई नाराज़!

Web Summary : ईरान-अमेरिका युद्धविराम से यूएई नाराज़ है, क्योंकि पाकिस्तान की मध्यस्थता से उसे अलग रखा गया। ईरानी हमलों से प्रभावित यूएई को शांति वार्ता से बाहर रखा गया, जिससे राजनयिक तनाव और विश्वासघात के आरोप लगे।

Web Title : Iran-US truce cheers world, UAE fumes over Pakistan's perceived betrayal.

Web Summary : Iran-US ceasefire irks UAE, feeling sidelined by Pakistan's mediation. UAE, heavily impacted by Iranian attacks, was excluded from peace talks, causing diplomatic strain and accusations of betrayal due to perceived disregard for its interests.