पाकमध्ये अतिरेकी हल्ला : ३ सैनिक ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 06:39 IST2025-03-17T06:38:41+5:302025-03-17T06:39:14+5:30
क्वेट्टा ( पाकिस्तान ) : अशांत बलुचिस्तान प्रांतात रविवारी बलूच बंडखोरांनी केलेल्या अतिरेकी हल्ल्यात तीन सैनिकांसह पाचजणांचा मृत्यू झाला. ...

पाकमध्ये अतिरेकी हल्ला : ३ सैनिक ठार
क्वेट्टा (पाकिस्तान) : अशांत बलुचिस्तान प्रांतात रविवारी बलूच बंडखोरांनी केलेल्या अतिरेकी हल्ल्यात तीन सैनिकांसह पाचजणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात ३० जवान जखमी झाले. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
नोश्की भागात राष्ट्रीय महामार्गावर निमलष्करी दलाच्या ताफ्याला निशाणा बनवून हल्ला करण्यात आला. यात तीन अतिरेकीही ठार झाले. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. याच संघटनेने मागील आठवड्यात जफर एक्स्प्रेसचे अपहरण करून प्रवाशांना ओलीस बनवले होते.
पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांवरून हा आत्मघाती हल्ला होता. नोश्वी-दलबंदिन महामार्गावर स्फोटकांनी भरलेल्या एका वाहनाने फ्रंटिअर कॉर्पच्या ताफ्याला धडक दिली. यानंतर भीषण स्फोट झाला.