पाकमध्ये विमानतळावर अतिरेकी हल्ला

By admin | Published: August 30, 2015 10:20 PM2015-08-30T22:20:50+5:302015-08-30T22:20:50+5:30

पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान भागात रविवारी दुचाकीवर आलेल्या अतिरेक्यांनी विमानतळावरच हल्ला केला. यात दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला असून,

The terrorist attack on the airport in Pakistan | पाकमध्ये विमानतळावर अतिरेकी हल्ला

पाकमध्ये विमानतळावर अतिरेकी हल्ला

Next

कराची : पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान भागात रविवारी दुचाकीवर आलेल्या अतिरेक्यांनी विमानतळावरच हल्ला केला. यात दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला असून, अतिरेक्यांनी विमानतळावरील एका अधिकाऱ्याचे अपहरण केले आहे.
बलुचिस्तान भागात ग्वादर जिल्ह्यात जिवानी येथील विमानतळावर अतिरेक्यांनी सशस्त्र हल्ला केला. पोलिसांनी सांगितले की, या हल्ल्यात दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला, तर विमानतळाचे वरिष्ठ अधिकारी महमूद नियाजी यांचे अतिरेक्यांनी अपहरण केले आहे.

Web Title: The terrorist attack on the airport in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.