शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

दक्षिण कोरियात भीषण अपघात; उतरताना विमान पेटले, १७९ प्रवाशांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 06:17 IST

पक्ष्याने धडक दिल्यामुळे दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज, लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याने केले आपत्कालीन लँडिंग, धावपट्टीवर उतरल्यानंतर विमान वेगाने कुंपणाच्या भिंतीवर धडकले...

सेऊल : दक्षिण कोरियात एका विमानतळावर उतरताना घसरून प्रवासी विमानाला लागलेल्या भीषण आगीत १७९ प्रवाशांचा मृत्यू झाला. यात ८५ महिला व ८४ पुरुषांचा समावेश आहे. १० जणांची ओळख अद्याप पटू शकली नव्हती. विमानात एकूण १८१ प्रवासी होते. फक्त दोघांचा जीव वाचू शकला. चालक दलाच्या दोघांना सुरक्षित काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. 

स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ च्या सुमारास मुआन शहरातील विमानतळावर ‘जेजू एअर’च्या विमानाला हा अपघात झाला. १५ वर्षे जुने बोईंग-७३७-८०० हे जेट विमान बँकॉकहून परतत असताना धावपट्टीवर घसरले आणि शेवटी असलेल्या कुंपणाच्या भिंतीला धडकले. विमान धडकताच प्रचंड आग लागली. 

विमानाचा ब्लॅक बॉक्स व कॉकपिट व्हाईस रेकॉर्डरच्या माध्यमातून अपघाताची कारणे शोधली जातील. १९९७ मध्ये कोरियन एअरलाइन्सचे एक विमान ग्वाममध्ये कोसळून त्यात २२८ प्रवासी ठार झाले होते.

तब्बल ३२ अग्निशामक वाहनांनी विझविली आगविमान उतरताच पेटल्यानंतर तातडीने अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या. या ३२ वाहनांनी १५६० कर्मचाऱ्यांसह आग आटोक्यात आणली. परंतु, तोवर अनेक प्रवाशांचा भाजून मृत्यू झाला होता. या अपघातात विमान पूर्ण नष्ट झाले आहे. विमानाचा अगदी शेवटचा भाग थोडा शिल्लक आहे.

वैमानिकाला इशारा?- या अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात असून प्रारंभिक माहितीनुसार, पक्षी धडकल्यामुळे हा अपघात झाला असावा, असे मानले जात आहे. - कारण, उतरण्यापूर्वी काही वेळ नियंत्रण कक्षाने पक्ष्यांबाबत वैमानिकाला इशारा देणारा संदेश पाठविला होता.

बेली लँडिंग म्हणजे काय? का झाले नाही यशस्वी?विमान उतरताना चाके उघडली नाहीत तर आपत्कालीन स्थितीत ते उतरवले जाते. याला बेली लँडिंग म्हणतात. अशा स्थितीत विमानाची बॉडीच जमिनीवर धडकून घसरत जाते. या अपघातात या प्रकारे लँडिंग झाले; परंतु वेग कमी झाला नाही.

कॅनडात विमान धावपट्टीवरून घसरले : कॅनडामध्ये शनिवारी रात्री (भारतीय वेळेनुसार रविवारी सकाळी ८ वाजता) हॅलिफॅक्स विमानतळावर उतरताना एक प्रवासी विमान घसरले. लँडिंग करताना विमानाचा एक भाग धावपट्टीच्या दिशेने झुकला. त्यामुळे विमानाच्या पंखाला आग लागली. मात्र, या अपघातात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

या महिन्यातील अपघात असे...- २५ डिसेंबर : अझरबैजान एअरलाइन्सचे विमान कझाकस्तानमधील अकताउ विमानतळाजवळ क्रॅश होऊन ३८ लोक ठार झाले.- २२ डिसेंबर : ब्राझीलमध्ये एकाच कुटुंबातील १० जणांचा एका छोट्या खासगी विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेत जमिनीवर १७ लोक जखमी झाले.- २२ डिसेंबर : नॉर्थ कोस्ट एव्हिएशनकडून चालवले जाणारे आयलँडर हे विमान पापुआ न्यू गिनीमध्ये कोसळून सर्व पाच लोक ठार झाले.- १७ डिसेंबर : द बाँबारडीयर विमान अर्जेंटिनामधील सन फर्नांडो विमानतळाजवळ कोसळून दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :AccidentअपघातairplaneविमानfireआगDeathमृत्यू